सिडनी, 16 एप्रिल : सध्या जगात फक्त एकच समस्या आहे ती म्हणजे कोरोना व्हायरसची. या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. अमेरिका, चीन, इटली, स्पेन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अर्थात सर्वच बंद असल्यानं क्रिडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धांचे आयोजन रद्द कऱण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीची अंदाज घेऊन पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची तयारीही केली जात आहे.
इंडियन प्रीमियर लीगही आता जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाची परिस्थिती सुधारली तर ऑक्टोंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी खास व्यवस्था कऱण्यात येणार आहे. अद्याप हा दौरा होईल की नाही याची खात्री नाही.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यास अॅडलेडमधील एका हॉटेलमध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 4 कोटी 20 लाख डॉलर किंमतीच्या हॉटेलमध्ये खेळाडूंना ठेवलं जाईल असं वृत्त द एजने दिलं आहे. पाहुण्या संघाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रमुख किथ ब्रेथशा यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अशी विनंती केली आहे. 138 रूम असलेलं हॉटेल सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तर 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होईल.
हे वाचा : लॉकडाऊनचा IPLलाही फटका, अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली स्पर्धा
वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी, वनडे आणि टी20 मालिका होणार आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर याकाळात टी20 वर्ल़्ड़ कप होणार आहे. यानंतर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे.
पाहा VIDEO : लॉकडाऊनमध्ये बॅट सोडून रवींद्र जडेजानं हातात घेतली तलवार आणि...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.