मुंबई, 16 एप्रिल : बिग बॉस आणि सिनेमांपेक्षा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एजाज खानच्या एका व्हिडीओेमुळे खळबळ माजली असून ट्विटरवर #अरेस्ट_एजाज_खान हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एजाजनं वादग्रस्त टीका केली. ज्यामुळे अनेक युजर्स एजाज खानला अटक करण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे करताना दिसत आहेत.
सोशल मीडियिवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एजाज खाननं मुस्लीम लोकांना देशातल्या प्रत्येक समस्येचं कारण म्हटलं जाण्याचा विषयावर भाष्य केलं आहे. मात्र त्यात त्यानं अनेक अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे सर्वांनी ट्विटरवरून एजाज खानच्या अटकेची मागणी केली आहे. सध्या ट्वीटरवर #अरेस्ट_एजाज_खान हा हॅशटॅश नंबर वन बनला आहे.
काही जोकरांमुळे कोरोना पसरतोय, डॉक्टर-पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर भडकला भाईजान
एजाज खाननं 15 एप्रिलला रात्री 12.30 ला फेसबुक लाइव्ह केलं होतं. यावेळी तो या विषयावर बोलला आहे. या लाइव्ह व्हिडीओमध्ये एजाज खान म्हणाला, मुंगी मेली मुस्लीम जबाबदार, हत्ती मेला मुस्लीम जबाबदार, दिल्लीत भूकंप झाला मुस्लीम जबाबदार म्हणजे देशातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मुस्लीमांना जबाबदार ठरवलं जातं. मात्र हा बनाव रचला जात आहे. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हा व्हिडीओमध्ये एजाज खाननं या सर्व गोष्टींसाठी एका राजकीय पार्टीला जबाबदार ठरवलं आहे.
एजाज खाननं या व्हिडीओमध्ये, कोरोनापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक अशाप्रकारे त्याला धर्माशी जोडत असल्याचं म्हटलं आहे. या देशात काही लोक असे आहेत जे कोरोना सर्वांना व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत असंही या व्हिडीओेमध्ये एजाज खाननं म्हटलं आहे.
A complaint lodged by "former Shiv sena" leader Ramesh Solanki against Faruqui munawar. Can any present leader of Shiv sena has guts to condemn Faruqui?? He lives in Mumbai.#ArrestFaruquiMunawar#अरेस्ट_एजाज_खान pic.twitter.com/tKehhQ5b1q
— Ashutosh soni (@ashutoshsoni888) April 16, 2020
एजाज खानचं हे लाइव्ह जवळपास 9 मिनिटांचं आहे. जे 67 हजार पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आलं आहे. याशिवाय हे लाइव्ह 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. एजाजनं त्याच्या या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यासोबतच त्यानं वांद्रे स्थानकत झालेल्या गर्दीविषयी म्हटलं आहे की, काही मुस्लीम ग्रुपमध्येही असे मेसेज पाठवण्यात आले होते. त्यांनी हे सर्व यासाठी केलं कारण त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लोकांसाठी जे काम करत आहेत ते त्या लोकांना बघवत नाही आहे. एजाजनं पुढे म्हटलं आहे की, जे लोक या देशात हिंदू-मुस्लीम असा भेद करत आहेत त्यांना जागवण्यासाठी कोरोना आला आहे. एजाज खानच्या या व्हिडीओमध्ये अतिशय वाईट भाषा वापरण्यात आल्यानं आम्ही हा व्हिडीओ या वृत्तासोबत जोडू शकत नाही.
Shame on #JahilJamati #अरेस्ट_एजाज_खान pic.twitter.com/wUM6aN8UXx
— Hinduism At STAKE🕉️ (@WakeUpHindu) April 16, 2020
Dear @MumbaiPolice some months ago u arrested Azaz khan under section 153A which is promoting enmity between two groups and section 67 which is transmitting obscene material in electronic form Now again he is doing such things Is it not a invalid act?plz arrest#अरेस्ट_एजाज_खान
— Jeevan (@Agastya88208135) April 16, 2020
एजाज खानच्या व्हिडीओमधील सुरुवातीचा काही भाग ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओतील त्याच्या भाषेवरून त्याच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एजाज खआनला अटक करण्याची मागणी होत असून ट्वीटवर सध्या #अरेस्ट_एजाज_खान ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांना रिट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत एजाज खानवर कारवाईची मागणी केली आहे.
(संपादन : मेघा जेठे.)
रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता
वेळ पडल्यास कर्ज काढेन पण स्टाफला पगार देईन, बॉलिवूड अभिनेत्याची घोषणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood