मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha : रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO

Wardha : रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO

X
रेल्वे

रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम'

'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम' सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष स्टॉल्स उघडण्यात येत आहेत.

  वर्धा, 28 जुलै : भारतातील रेल्वे स्थानकांवर (Railway Stations) 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम' (One Station One Product Schemes) सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष स्टॉल्स उघडण्यात येत आहेत. स्थानिक कला, उत्पादने यांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. वर्धा रेल्वे स्थानकावर देखील असे स्टॉल्स (Stall) सुरू झाले असून हॅण्डमेड बॅग्स, टिफीन बॅग्ज, हळद पावडर, पापड, विविध प्रकारचे लोणचे, सरगुंडे, शेवई आदी उत्पादनांची येथे विक्री केली जात आहे. 

  रेल्वे मंत्रालयाने 'व्होकल फॉर लोकल' या योजनेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. देश, परदेश व अन्य राज्यातून आलेल्या प्रवाशांना वर्धा जिल्ह्यातील विशेष उत्पादनांची माहिती व्हावी, त्यातून स्थानिक उत्पादनाची जास्तीत जास्त प्रमाणात विक्री व्हावी, या उद्देशाने वर्धा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.   या स्टॉलमधून प्रवाशांना हॅण्डमेड बॅग्स, टिफीन बॅग्ज, हळद पावडर, पापड, विविध प्रकारचे लोणचे, सरगुंडे, शेवई आदी विविध स्थानिक उत्पादनांची खरेदी करता येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने वर्धा रेल्वे स्थानकावर 'एक स्टेशन एक उत्पादन' योजना सुरू करण्यात आली आहे.

  हेही वाचा- एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story

  रेल्वे स्थानक मार्केटिंग चॅनल म्हणून काम करून स्टॉल वाटप करत आहे. स्थानिक उत्पादनांच्या विशिष्ट क्षेत्रासाठी वेगळी व स्वतंत्र विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा रेल्वेस्थानकावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूहाद्वारे निर्मित केलेल्या विविध वस्तूंचा स्टॉल लावण्यात आलेला आहे. 

  स्टॉल हवा असल्यास हे करा

  ही योजना एका महिन्यासाठी राबविण्यात येणार आहे. कारागिरांची ओळख स्थानिक स्वयंसहाय्यता गट आणि स्वयंसेवी संस्थांद्वारा करून देण्यात येईल. ज्या सहकारी संस्था निर्धारित उत्पादनांची विक्री व जाहीरात करू इच्छित आहे. त्यांनाही त्यात सहभागी होता येईल, यामध्ये दोन अर्जदारांना 15-15 दिवसांसाठी या योजनेचा लाभ घेण्याची संधी देण्यात येणार आहे. 

  हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report

  स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणारा उपक्रम

  स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय वर्ध्याची बाजारपेठ वाढविण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्ध्यातील स्थानिक उत्पादनांचे आता रेल्वे मार्केटिंग करेल. रेल्वे विभागाच्या वतीने स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्टेशन एक उत्पादन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे स्थानकावर येणाऱ्या उत्पादनाला महत्त्व मिळणार हे मात्र खरे आहे. वर्धीनी महिला समूहाचा  रेल्वे स्टेशन वर स्टॉल लावल्यामुळे महिला ना आपल्या उत्पादनाच्या वस्तू लोकांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी एक उत्तम मार्ग मिळाला असल्याचे वर्धीनी स्टॉल चालक संगीता गायकवाड यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Indian railway, Maharashtra News, Wardha, Wardha news