मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story

Osmanabad : एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story

मच्छिंद्र राजाभाऊ झाडे

मच्छिंद्र राजाभाऊ झाडे

उसातली भानगड या वेब सीरिजचे दिग्दर्शक मच्छिंद्र झाडे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मच्छिंद्र हे अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

उस्मानाबाद, 26 जुलै: सध्या सोशल मिडियाचा (Social media) जमाना आहे असं म्हटले जाते. सोशल मिडियाद्वारे अनेकांनी आपले करिअर सेट केली आहेत. अनेकांनी सोशल मिडियाचा वापर करून नाव तर कमावले आहेतच पण भरपूर कमावत देखील आहेत. हलाखीच्या परिस्थितीत जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मच्छिंद्र राजाभाऊ झाडे (Machindra Rajabhau Zade) यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले नाव कमावले आहे. “उसातली भानगड” (Usatali Bhangad) या वेब सीरिजची त्यांनी निर्मिती केली असून सोशल मिडियावर या वेब सीरिजने धुमाकूळ घातला आहे. आज एखादी यशस्वी व्यक्ती यशाच्या उंच शिखरावरती पोहोचते ते यश सर्वांना दिसते. मात्र, त्यामागचे कष्ट, मेहनत अनेकांना दिसून येत नाही. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला यायचं आणि सिनेमासृष्टीचे स्वप्न पहायचे हे ऐकायला कितीतरी अवघड वाटते, आणि त्यामध्ये कुटुंबाची परिस्थिती खूपच हलाखीची असेल तर आणखीनच अवघड. उस्मानाबाद जिल्ह्यातून दिग्दर्शक, कथाकार, कलाकार संकलक म्हणून नावारूपाला आलेले मच्छिंद्र राजाभाऊ झाडे यांचा जीवन प्रवास खूपच खडतर राहिलेला आहे. युट्युबवरील तुम्ही उसातली भानगड ही वेब सिरीज कधी ना कधी तर पाहिलीच असेल. या वेब सिरीज मधील सुरज्या नावाचं पात्र अनेक प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून आकर्षित करतं आहे. सुरज्या या पात्राचच खरं नाव हे मच्छिंद्र राजाभाऊ झाडे. मच्छिंद्र झाडे हे या वेब सीरिजचे सर्वस्व आहेत. जसे की लेखक, दिग्दर्शक, कथाकार, अभिनेता त्यासोबतच एडिटर, छायांकन अशा सर्वच महत्त्वाच्या जबाबदारी ते स्वत:हून सांभाळतात. उसातली भानगड ही वेब सिरीज सध्या महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांना मनावर राज्य करत आहे. यामधील अस्सल गावखेड्यातील कलाकार काम करत असल्याने त्यांचा नैसर्गिक अभिनय या वेब सीरिजच्या कथेला खरेपणाचे स्वरूप मिळवून देतो. या अगोदर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक वेब सीरिजचे शूटिंग झाले. त्यामध्ये आगाऊ चांडाळ चौकडीच्या आगाऊ करामती ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली वेब सिरीज होती. त्यानंतर करामती कार्टी, तेरणा कीठची पोरं या इतर वेब सीरिजला प्रेक्षकांची मने जिंकता आली नाहीत. त्या अभावी इतर वेब सीरिजचे शूटिंग बंद पडले. मात्र उसातली भानगड ही जिल्ह्यातील एकमेव वेब सीरिजला, लाखो प्रेक्षक आज पसंती दर्शवितात. हेही वाचा- Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO मच्छिंद्र राजाभाऊ झाडे यांचा खडतर प्रवास उसातली भानगड या वेब सीरिजचे दिग्दर्शक मच्छिंद्र झाडे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मच्छिंद्र हे अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी मच्छिंद्र यांच्या आई शोभा राजाभाऊ झाडे यांच्या खांद्यावरती आली. मच्छिंद्र यांचे पहिली व दुसरीचे शिक्षण त्यांच्या मुळगावी झाले. नंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वाशी गाठली. वाशीत सरकारी शाळेत त्यांनी फक्त दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी 5 वी नंतरच्या शिक्षणासाठी जिल्ह्याचे ठिकाण गाठले. उस्मानाबाद या ठिकाणी त्यांनी 5 वी ते 8 वी पर्यंतचे शिक्षण घेतले.  आठवी नंतर मच्छिंद्र यांना शिक्षणात रस काही राहिला नाही. घरी आईला काहीच न कळवता काम करण्यासाठी त्यांनी पुणे जवळ केले. पुण्यात गेले खरे पण तेथे त्यांची कोणासोबतही ओळख नव्हती. हाताला काही काम न लागल्याने पर्यायी त्यांनी एका मोठ्या माणसाकडे काही महिने म्हशी पाळल्या. नंतर त्यांना पुण्यातील एका नातेवाईकांबद्दल समजले. आता त्यांनी त्याच्याकडे काम करण्याचे ठरविले. नातेवाईकांकडे पोहोचल्यानंतर त्यांना समजले की इथे कचरा वेचण्याचे काम आहे. तोंडाला रुमाल बांधून मच्छिंद्र यांनी कामाला सुरुवात केली. जवळपास एक वर्षे त्यांनी कचरा वेचण्याचे काम केले. नंतर वयाच्या 19 व्या वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न केले. लग्नानंतर मच्छिंद्र एका हॉटेलवरती वेटर म्हणून काम करू लागले. यावेळी त्यांनी कायम वेटर म्हणून काम करायचे ठरविले. हेही वाचा- Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO सिनेमात कशी आवड निर्माण झाली २०१६ साली नागराज मंजुळे यांचा सैराट या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. सैराट हा सिनेमा पाहण्यासाठी मच्छिंद्र यांनी हॉटेल मालकांकडून उचल घेऊन उस्मानाबाद, बार्शी, बीड याठिकाणी प्रवास केला. मात्र त्यांना हा सिनेमा लवकर पहायला मिळाला नाही. आठ दिवसानंतर जेंव्हा त्यांनी सैराट पाहिला त्यामधील अभिनय पाहून मच्छिंद्र यांनी अभिनय करायचे ठरविले. वेटर म्हणून काम करत असताना मच्छिंद्र अभिनय करायचे. सिनेमे पाहत असताना त्यांना चित्रपटाच आणि चित्रपट सृष्टीच आकर्षण वाटू लागले. यामधून त्यांना विचार आला की आपल्या आयुष्यातील वास्तव लोकांसमोर मांडायला हवे, आणि म्हणून ते लघुचित्रपट सृष्टीकडे वळाले, त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतलेले नाही. त्यानंतर त्यांनी प्रथमच यूट्युबवर सैराट चा एक व्हिडीओ आपल्या पद्धतीने बनविला. त्या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. वेब सीरिजची निर्मीती कशी केली मच्छिंद्र यांना व्यायामाची खूप आवड आणि पहिल्या व्हिडिओला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता त्यांनी व्यायामाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड करायला सुरूवात केली. अशा व्हिडीओ ला प्रेक्षकांचा हवा एवढा प्रतिसाद मिळायचा नाही. त्यामुळे त्यांनी गावातील काही कलाकारांना सोबत घेऊन वेब सीरिजची निर्मिती केली. आजच्या घडीला ही वेब सिरीज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत आहे.  युट्युवरून कमाई कशी होते  जेंव्हा एखादी व्यक्ती युट्युबवर व्हिडीओ अपलोड करते तेंव्हा त्या व्यक्तिला एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास वॉच टाइम 12 महिन्यांच्या आत पूर्ण करावा लागतो. असा युट्युबचा नियम आहे.  हे सर्व पूर्ण केल्यानंतर अॅडसेन्स अकाऊंट मध्ये डॉलरच्या रुपात रक्कम जमा होते. भारतीय चलनानुसार चलन बदलून ती रक्कम प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला संबंधित व्यक्तिच्या खात्यात जमा होते.
First published:

Tags: Osmanabad, Success story

पुढील बातम्या