मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report

Osmanabad : पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report

रेशीम शेती

रेशीम शेती

खामकरवाडी हे रेशम उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. रेशमचे गाव अशी या गावाची नवी ओळख बनत आहे.

उस्मानाबाद, 26 जुलै : पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत जिल्ह्यातील शेतकरी आता शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या तुतीची शेती करत आहेत. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून (Silk Farming) आधुनिक क्रांती घडवत आपल्या गावाचा आर्थिक गाडा रूळावर आणला आहे. खामकरवाडी (Khamkarwadi) असे त्या गावाचे नाव असून हे गाव रेशम उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. रेशीम रेतीच्या माध्यमातून येथील शेतकरी लोखोंचे उत्पादन मिळवत आहेत.

जिल्ह्यातील खामकरवाडी गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचे पर्याय स्वीकारले आहेत. पारंपारिक शेती करत असताना खूप कष्ट करावे लागते आणि हवा तसा मोबदला देखील मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. ही बाब ओळखून येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करीत शेतात तुतीची लागवड केली आहे. शेती करत असताना एखाद्या जोड व्यवसायाची साथ नक्की असावी. आज शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, कुकुट पालन, शेळीपालन असे जोडधंदे घेतले जातात. नवीन युगाचे नवीन व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात करता येतो. आज रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत सर्वात जास्त उत्पन्न घेता येते.

पारंपारिक शेती फायद्याची ठरत नव्हती

खामकरवाडी हे रेशम उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. रेशमचे गाव अशी या गावाची नवी ओळख बनत आहे. खामकरवाडी या गावतील अनेक नागरिकांचा व्यवसाय हा शेतीचं. गावाची लोकसंख्या देखील जवळपास जेमतेम दीड हजार. जवळपास सर्वच शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने पारंपारिक पद्धतीने शेती करणे शेतकर्‍यांना फायद्याचे ठरत नव्हते. जमिनीची आद्रताही कमकुवत असल्याने नगदी पिकांना म्हणावा तेवढा उतार पडत नसायचा. त्यामुळे गावातीलच काही शेतकर्‍यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरूवात केली. गावात सर्वप्रथम पंकज लुगडे आणि त्यांच्या बंधूंनी 9 वर्षांपूर्वी आपल्या शेतात दीड एकर तुतीची लागवड केली. सोयाबीन, हरभरा, गहू आणि ज्वारी यांसारख्या पिकांसाठी कष्ट खूप आणि हवा तेवढा मोबदला ही मिळत नसे. म्हणून खामकरवाडी या गावातील शेतकर्‍यांनी पारंपारिक शेती न करता विकसित शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Khamkarwadi

गुगल मॅपवरून साभार

हेही वाचा- Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO

रेशीम शेती म्हणजे काय?

रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळावे लागतात. याला रेशीमपालन म्हणतात. हा एक बारीक चमकदार फायबरचा प्रकार आहे. ज्यापासून कपडे विणले जातात. हे फिलामेंटस सेलमध्ये राहणाऱ्या वर्म्सपासून तयार केले जाते. शेतकर्‍यांना कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न रेशम व्यवसायातून मिळवता येते. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. सरी पद्धतीने तुतीची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. लागवडीपासून पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 10 वर्षेपर्यंत तुतीचे झाड जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकाप्रमाणे वारंवार येत नाही. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो.

वेळ, श्रम, व पैसा वाचेल

सरी पद्धतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करून घेता येते. यामुळे मजुरी खर्चात व वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होते. तुती बागेस रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळ्यांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैकी सुरुवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम कीटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांसह अवघ्या 14 दिवसांत कोश उत्पादनाचे पीक शेतकरी घेत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होते. बेरोजगारांना नोकऱ्या शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. इतर शेती पिकाप्रमाणे यात पूर्ण व मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पद्धतीने होत असून त्याचा दर रु. 300/- ते रु.550/- प्रती किलो आहे.

उद्योगाला बाजारात मागणी

रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी वाढत आहे. स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कीटक संगोपन, धागा व वस्त्र निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती तसेच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रेशीम शेती उद्योगामुळे थांबवता येते. खामकरवाडी मधील शेतकरी स्वत:चे रेशम बैंगलोर व जालना या ठिकाणी विकला जातो.

हेही वाचा- Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO

शेतकऱ्यांना सरकारी अनुदान

जिल्हास्तरीय योजनेमध्ये शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी जिल्हा कार्यालयाच्या वतीने मोफत बेणे पुरवठा केला जातो. 75 टक्के अनुदानाची रक्कम संचालनालयामार्फत दिली जाते. शेतकऱ्यांकडून 25 टक्के रक्कम अंडीपुजापोटी घेतली जाते अशी माहिती रेशम शेती मार्गदर्शक  हनुमंत पवार यांनी दिली.

रेशीम शेती उद्योग करताना अशी घ्या काळजी

कीटकांचे पालन खोलीच्या आतच केले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम तुतीची पिशवी लावली जाते. हे कीटकांना खाण्यासाठी पाने देते. लक्षात ठेवा खोलीत स्वच्छ हवा आणि चांगली प्रकाश येण्याची व्यवस्था असावी. यासह, खोलीत लाकडी ट्रायपॉड्सच्या वर ट्रे ठेवल्या जातात, ज्यामध्ये त्यांचे पिकवणे केले जाते. हे ट्रायपॉड्स मुंग्यांपासून दूर ठेवण्यासाठी पाण्याखाली भरलेले पात्र पायाखाली ठेवा. कीटक दररोज स्वच्छ करत रहा.

रेशीम शेती फायद्याची 

कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. तब्बल चौदा दिवसात उत्पन्न मिळते. मजुराचा व इतर खतांचा खर्च वाचतो. शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होते. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती हा नक्कीच एक सर्वात जास्त नफा मिळणारा व्यवसाय आहे असे रेशन उत्पादक शेतकरी तानाजी पायाळ यांनी सांगितले.

First published:

Tags: Agriculture, Farmer, Maharashtra News, Osmanabad, शेतकरी