जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News : तुमच्या कुत्र्याला पाणी पिता येत नाहीय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी दिला गंभीर सल्ला

Wardha News : तुमच्या कुत्र्याला पाणी पिता येत नाहीय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी दिला गंभीर सल्ला

Wardha News : तुमच्या कुत्र्याला पाणी पिता येत नाहीय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी दिला गंभीर सल्ला

तुमच्या घरातील कुत्र्याची पावसाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

वर्धा, 30 जून : कुत्रा पाळणं हे अनेकांना आवडतं. वेगवेगळ्या जातीची आणि आकर्षक दिसणारी कुत्री मोठ्या आवडीने पाळली जातात. या कुत्र्यांची काळजी घेणं देखील तितकच आवश्यक आहे. विशेषत: पावसाळ्यात कुत्र्यांना कोणते आजार होऊ शकतात? हे आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी याबात वर्ध्यातील पशूसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण तिखे यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कोणत्या आजारांचा धोका? पावसाळ्यामध्ये माणसांप्रमाणे कुत्र्यांना देखील निरनिराळे आजार होतात.  गॅस्ट्रो, डायरिया या आजारांची त्यांना लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यामुळे तुमच्या घरी कुत्रा असेल तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे, असं डॉक्टारांनी सांगितलं.

News18लोकमत
News18लोकमत

रेबीज हा अत्यंत भयंकर आजार असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. मोकाट किंवा पाळीव प्राण्यांना देखील  आजार होतो. हा आजार टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या घरच्या पाळीव श्वानाला नीट पाणी पिता येत नसेल. तो पिसाळल्यासारखा करत असेल तर वेळीच सावध होऊन डॉक्टरांशी संपर्क करा. त्याची योग्य ट्रिटमेंट आवश्यक आहे. असा सल्ला डॉ. तिखे यांनी दिला. रात्रीच्या वेळी कुत्री का रडतात? त्यांना असं काय दिसतं? काय आहे कारण? लसीकरण का आवश्यक? पाळीव किंवा मोकाट श्वानांमध्ये डायरिया गेस्ट्रो किंवा रेबीज सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एखादा श्वानाला रेबीज सारख्या आजाराने ग्रासले तर ते माणसांसाठी देखील धोकादायक ठरते. त्याचबरोबर  घरात लहान मुले असतील तर सर्वांनी काळजी घ्यावी. घरातील श्वानाला दरवर्षी विशेष लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असं डॉ. तिखे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात