वर्धा, 19 ऑक्टोबर : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अगदी जवळ आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. ग्राहकांची देखील विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने बाजारात दिवाळीसाठी गर्दी नव्हती. मात्र, यंदा मार्केट पुन्हा एकदा गजबजले आहे. दिवाळीच्या अनुषंगाने शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. आकर्षक आकाश कंदील, पणत्या, रोषणाईच्या माळा, रंगीबेरंगी तोरण, महालक्ष्मीच्या मूर्ती अशा नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. महागाईची झळ या सर्व वस्तूवर दिसत असली तरी वर्षातून एकदाच आणि आनंदाचा सण असल्याने नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दिवाळीत महागाईचे चटके यंदाच्या दिवाळीत महागाईचे चटके बसणार यात दुमत नाही. खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. मिठाई, फराळ बनविण्याचे साहित्य, कपडे, फटाके, रांगोळी, कंदील, दिवे आदी गोष्टींची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात एकच गर्दी उसळू लागली आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीलाही उधाण आले आहे. Video : वृक्ष संवर्धनाची नवी क्रांती, घरबसल्या मिळेल लावलेल्या झाडांची माहिती पणत्या 30 रुपये डझन बाजारपेठ लहान पणत्यांपासून मोठ्या पणत्यांनी सजली आहे. या एक डझन पणत्यांची किंमत 30 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत आहे. यावेळी दिवाळीसाठी आकर्षक अशा वेगवेगळ्या पणत्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. यात काही पणत्या साध्या मातीच्या तर काही पणत्या चिनी मातीच्या देखील उपलब्ध आहेत. Video : दिवाळीपूर्वी तेल विक्रेत्यांना चाप, अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर! 52 रंगाच्या रांगोळी दिवाळी हा तसा प्रकाशाचा सण समजला जातो. त्यामुळे घरावर आकर्षक अशी लाईट सजवली जाते. सजावटीच्या लाईट देखील बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत या लाईट माळांच्या किमती आहेत. त्याचसोबत विविध प्रकारची इलेक्ट्रिक पणत्या, समई, दिव्यांच्या माळा देखील उपलब्ध आहेत. विविध रंगाच्या रांगोळीची विक्री देखील वाढली आहे. रांगोळीचे 52 रंग, पोस्टर रांगोळीचे 10 रंग, रांगोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 10 प्रकारचे साचे बाजारात विक्रीसाठी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.