नागपूर, 19 ऑक्टोबर : ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे संदेश आपण अनेक ठिकाणी वाचतो. वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी शासन, सामाजिक संघटनांकडून महत्त्वाकांक्षी उपाययोजना राबविण्यात येतात. वृक्ष लागवडीपेक्षा वृक्षांचे संगोपन करणे हे मोठ्या जिकिरीचं काम असते. त्यामुळे हे काम सोपं करण्यासाठी शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक ॲप विकसित केले आहे. प्रत्यक्ष जागेवर न जाता नियमितपणे रोपाच्या वाढीचे निरीक्षण या ॲपद्वारे करता येणार आहे. आपल्याकडे विविध माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. मात्र, या वृक्षाचे संवर्धन, वृक्ष वाढीची देखभाल करणे अवघड बनते. या समस्येवर उपाय म्हणून शिवाजी विज्ञान महाविद्यालय आणि जे.डी. पाटील सांगळूदकर येथील सहायक प्राध्यापक राहुल सावरकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एक प्रणाली विकसित केली. घरबसल्या मिळेल वृक्षाची माहिती विकसित प्रणालीद्वारे प्रत्यक्ष जागेवर न जाता नियमितपणे प्रत्येक रोपाच्या वाढीचे निरीक्षण करता येईल. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन रोपे दिली जातील. वनस्पती प्रजाती नियुक्त केल्यानंतर विद्यार्थी योग्य ठिकाणी रोप लावतील आणि एक जिओटॅग फोटो घेतील. हा फोटो विकसित केलेल्या “I am Conservator” या अँड्रॉइड ॲपवर अपलोड करतील. Video : 10 वी, 12 वी पाससाठी गोल्डन चान्स, 2000 पदांवर होणार महाभरती! सर्व्हरवर डेटा प्राप्त होताच तो गुगल मॅपवर अपलोड केला जाईल. याप्रमाणे सात दिवसानंतर पुन्हा विद्यार्थी अलीकडील जिओटॅग फोटो घेतील आणि तो गुगल मॅपवर अपलोड करतील. याद्वारे दर सात दिवसानंतर वनस्पतींच्या वाढीवर लक्ष ठेवता येईल. नकाशा सांगळूदकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वेबसाइट वर देखील बघता येईल. या प्रणालीद्वारे अधिकारी आणि संबंधितांना प्रत्यक्ष जागेवर न जाता लावलेल्या झाडाची माहिती ऑफीसमध्ये बसून देखील बघता येईल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत झाडांची माहिती नुकतेच या प्रणालीचे उद्घाटन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते झाले. या प्रणालीद्वारे नकाशावरून झाडाची माहिती वनस्पतीचे नाव, संरक्षकाचे नाव, त्याचे औषधी उपयोग (हिंदी आणि इंग्रजी भाषेत) आणि अलीकडील जिओटॅग फोटोच्या स्वरूपात पाहू शकतात. Video : कायदे आहेत, पण अंमलबजावणीचं काय?, शासकीय कार्यालयातील पिचकाऱ्या कायमच! दर्यापूर भागातील 150 झाडे मॅप दर्यापूर विभागातील सामाजिक वणीकरण विभागाच्या सहयोगाने सध्या हा प्रकल्प दर्यापूर भागात चालवला जात आहे. गुगल मॅपमध्ये जवळपास 150 झाडे मॅप केली जाणार आहेत. आणि सदर सॉफ्टवेअरचे कॉपीराइट सुद्धा घेतले असल्याची माहिती माहिती सहायक प्राध्यापक सारंग धोटे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.