शिर्डी, 26 नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या (lockdown) काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधातील (Electricity Bill issue) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) (MNS) राज्यभर झटका मोर्चा काढला. मात्र, कोपरगाव (Kopargaon) येथील मनसे मोर्चाला हिंसक वळण लागलं. मनसे कार्यकर्त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच अभियंत्याच्या कॅबिनचीही नासधूस मोठ्या प्रमाणात नासधूस केली. कॅबिनच्या काचा फोडल्या. मनसे आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
हेही वाचा..कार-टँकरचा भीषण अपघात, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जण जागेवरच ठार
'वीज बिल भरु नका'
'वीज बिल भरु नका', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचं निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकारांना देण्यात आलं आहे. राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकानं वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असं आवाहन मनसेनं नागरिकांना दिलं आहे.
मनसे मोर्चाला हिंसक वळण... पाहा VIDEO @Rajthaceray #MNS pic.twitter.com/asKSeVlK0n
— News18Lokmat (@News18lokmat) November 26, 2020
राज ठाकरे म्हणाले, सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. आता मोर्चाच्या भाषेत समजावण्याची वेळ आली आहे. प्रचंड वीज बिलांद्वारे सरकारनं जनतेला शॉक दिला आहे. सरकारनं वीज बिलांमधून 'जिझिया कर' लावला आहे. राज्य सरकारकडून जनतेची लूट केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू वीज बिलांच्या विरोधात राज्यभरात निघालेल्या मनसेच्या मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्यानं मनसैनिकांना घेण्यात आलं आहे.
औरंगाबादमध्येही मनसेचं आंदोलन
पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही औरंगाबादमध्ये मनसेनी आंदोलन केले. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, तत्पूर्वीच पोलीसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी कार्यकर्त्यांसह औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकांमध्ये वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन सुरू केले.
हेही वाचा...वीज बिल भरु नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन
या आंदोलनात औरंगाबाद शहरातील मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनामुळे औरंगपुरा भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविल्याने छावणीचे स्वरूप आलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, MNS, Raj Thackeray