वीज बिल भरु नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन

वीज बिल भरु नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन

वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा...

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर: वाढीव वीज बिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. 'वीज बिल भरु नका', अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचं निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकारांना देण्यात आलं आहे.

राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकानं वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असं आवाहन मनसेनं नागरिकांना दिलं आहे.

हेही वाचा... मनसेचा ठाकरे सरकारला 'झटका', पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरू

राज ठाकरे म्हणाले, सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. आता मोर्चाच्या भाषेत समजावण्याची वेळ आली आहे. प्रचंड वीज बिलांद्वारे सरकारनं जनतेला शॉक दिला आहे. सरकारनं वीज बिलांमधून 'जिझिया कर' लावला आहे. राज्य सरकारकडून जनतेची लूट केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

वीज बिलांच्या विरोधात राज्यभरात निघालेल्या मनसेच्या मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्यानं मनसैनिकांना घेण्यात आलं आहे.

मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन

सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर पोलीस आपलं काम करतात. आम्ही आमचं काम करतो आहे, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

औरंगाबाद मनसेचं आंदोलन चिरडलं...

औरंगाबाद शहरात मनसेचं आंदोलन पोलिसांनी चिरडलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकाना ताब्यात घेतलं आहे. महात्मा फुले चौकातून मोर्चा जाऊ दिला नाही. दुसरीकडे, ठाण्यात मनसैनिकांची धरपकड सुरु झाली आहे.

पुण्यात पोलिसांनी मोर्चा रोखला

वाढीव वीजबिलाविरोधात काढलेल्या मनसेचा पुण्यात पोलिसांनी रोखला आहे महामोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलीस ठाण्यात आणलं आहे. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. मनसे मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत. फारसखाना पोलीस ठाण्यात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना येथेच बोलवा, नाहीतर आम्हाला ताब्यात घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहचतायत तसे पोलिस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. मनसेच्या मोर्चाला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...अंकिताचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक डान्स, VIDEO पाहून सुशांतच्या चाहत्यांची टीका

दरम्यान, सिंधुदुर्गात मात्र मनसेने मोर्च काढत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. मनसेचे कार्यकर्ते झेंडे आणि घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले आणि त्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन निवेदन दिले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 26, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading