बीड, 26 नोव्हेंबर: औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर (Aurangabad Beed National Highway) कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघात (Major Accident) होऊन चार जणांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. गेवराई शहराजवळील ही घटना घडली आहे.
मृतांमध्ये वंचित बहूजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi leader) लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा समावेश आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा..वीज बिल भरु नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन
मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहरालगत झमझम पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी हा भीषण अपघात झाला. वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा जागेवरच तर व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर इतर दोघांचा उपचारादरमयान मृत्यु झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे, पनवेलजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लालपरी अर्थात एसटी बसला भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री उशीरा पनवेलपासून 9 किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे लालपरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भरधाव अज्ञात वाहनानं एसटीला जोरदार धडक दिली.
हेही वाचा...हिवाळ्यातही मुसळधार पाऊस आणि वादळ! 'निवार'चं भीषण रूप दाखवणारे PHOTOS
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक लागल्याने गंभीर अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा पत्रा पूर्णपणे निखळला. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.