Home /News /mumbai /

कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय? जितेंद्र आव्हाड संतापले, दिला सज्जड इशारा

कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय? जितेंद्र आव्हाड संतापले, दिला सज्जड इशारा

'शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वक्तव्य आमदार पडळकर यांनी केलं.

    मुंबई, 24 जून: भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. 'शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वक्तव्य आमदार पडळकर यांनी केलं. पडळकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली आहे. हेही वाचा..शरद पवारांवरील वक्तव्यावर फडणवीसही संतापले, गोपीचंद पडळकरांना झापले राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतापले आहेत. कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आपण काय बोलतो ते कळतं का? त्यांची उंची किती आणि ते बोलतात किती? सध्याच्या कोरोना संकट काळात पडळकरांनी महाराष्ट्रात फिरुन दाखवावं.  शरद पवार यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही. कॅमेऱ्यावर मी काही सांगणार नाही. पण याचे तीव्र पडसाद उमटतील. ते महाराष्ट्र पाहील, असा सज्जड इशारा जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना दिला आहे.  शरद पवार यांचं महाराष्ट्रासाठी काही योगदान नाही, असं म्हणणारा व्यक्ती वेडा आहे, नाही तर त्याचा हा पब्लिसिटी स्टंट आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. काय म्हणाले होते पडळकर? 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीकाही पडळकरांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला. राज्यभरात पडसाद... शरद पवार हे राज्याला लागलेले कोरोना आहे, अशी विखारी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आता याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढेचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला. हेही वाचा.. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, धनंजय मुंडेंनी भाजप आमदारावर केला पलटवार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असंही अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    पुढील बातम्या