Home /News /pune /

शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय, पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय, पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कात्रजच्या आंबेगाव खुर्द येथील शृष्टीलेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वैशाली राऊळ हिनं टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली आहे.

पुणे, 24 जून: लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात ही घटना घडली आहे. वैशाली राऊळ (वय-30) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. वैशालीच्या पतीनं पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय? जितेंद्र आव्हाड संतापले, दिला सज्जड इशारा कात्रजच्या आंबेगाव खुर्द येथील शृष्टीलेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वैशाली राऊळ हिनं टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली आहे. महिला पतीसह राहत होती. पती रिक्षाचालक तर मयत महिला ब्यूटी पार्लर चालवत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शृष्टीलेक अपार्टमेंटमध्येच फ्लॅट घेतला होता. दरम्यान अचानक लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे रिक्षा थांबली, ब्यूटी पार्लरही चालनासे झाले. परिणामी घराचे हप्तेही थकले होते. आरोपी महिला वैशाली राऊळ यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना टोमणे मारीत होत्या, असं फिर्यादीत म्हटलं आहे. रविवारी (14 जून) या दोन महिलांचे आणि फिर्यादीच्या पत्नीचे याच कारणावरून भांडण झाले. यावेळी या दोन महिलांनी वैशाली राऊळ यांना फ्लॅटचा हप्ता भरू शकत नाही, तुझ्या घरी कुणीतरी येते असा आरोप करत तिच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील आरोप केले. चारित्र्यावर संशय घेतल्याच धक्का वैशाली यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा...धक्कादायक! केसगळतीमुळे डिप्रेशन; किशोरवयीन मुलीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य दरम्यान फिर्यादी महिलेच्या पतीने या धक्क्यातून सावरल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानुसार दोन महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

Tags: #Pune, Crime news, Maharashtra news, Pune news

पुढील बातम्या