मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रेतीचा उपसा जीवावर बेतला, अचानक पाणी वाढले आणि दोघे जण...

रेतीचा उपसा जीवावर बेतला, अचानक पाणी वाढले आणि दोघे जण...

 रेती काढत असताना नदी पात्रात अचानक पाणी वाढले आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही तरुण वाहून गेले.

रेती काढत असताना नदी पात्रात अचानक पाणी वाढले आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही तरुण वाहून गेले.

रेती काढत असताना नदी पात्रात अचानक पाणी वाढले आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही तरुण वाहून गेले.

  • Published by:  sachin Salve
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 06 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्यातील कानगांव परिसरात यशोदा नदीतून अवैध रेती उपसा करताना 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  तुषार लांभाडे, मंगेश सोनवणे असं मयत तरुणांची नावं आहे. जिल्ह्याच्या कानगाव येथील रहिवासी तुषार लांभाडे, मंगेश सोनवणे हे दोन युवक भगवा गावा जवळील यशोदा नदी वरून रेती काढण्यासाठी गेले होते. अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात होता. रेती काढत असताना नदी पात्रात अचानक पाणी वाढले आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही तरुण वाहून गेले. कोरोनाशी एकत्र लढूया, चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर येथील पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक योगेश कांबळे, जमादार चव्हाण, पोलीस शिपाई  महेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून वाहून गेलेल्या युवकांचा शोध सुरू केला. मात्र, अजूनपर्यंत दोन्ही तरुणाचा शोध लागला नाही. दोन्ही तरुण बुडून गेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू दरम्यान, वर्ध्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह 3 जण जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग सहावर पहाटेच्या सुमारास तळेगाव येथील उड्डाण पुलावर ही घटना घडली. यातील मृतकांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातात मृत झालेले तिघे जण हे महामार्गावर उशिरा रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण केल्यानंतर ते पुढील प्रवासा करिता निघाले. हॉटेलपासून काही अंतर दूर गेले असता दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. कोरोनाच्या विळख्यात औरंगाबाद! 300 हून अधिक रुग्णांची वाढ अज्ञात वाहनाने इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकी काही अंतर दूरपर्यंत फरफटत नेली होती. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातात मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह हे ओळख पटवण्याच्या परिस्थितीत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव (शाम.पंत) पोलीस घटना स्थळावर पोहोचले. तिघांनाही आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. 'सरकार' नावाची व्यवस्था आहे कुठे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू, विखेंचा हल्लाबोल अपघातातील युवक बौद्ध धर्माचे प्रसारक असल्याचे कळते. मात्र, त्यांची अद्याप ओळख पटली नाही. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.
First published:

Tags: Sand, Sand mafiya

पुढील बातम्या