मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाशी एकत्र लढूया, चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाशी एकत्र लढूया, चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा'

'राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा'

'राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 06 सप्टेंबर : महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना परिस्थितीत राज्य सरकारवर भाजप नेत्यांनी टीकेची एकही संधी सोडली नाही. परंतु, आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया, असे आवाहनच राज्य सरकारला केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी, 'राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा', असे आवाहन केले आहे.

तसंच, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली कोरोना महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही, उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहनही पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे' असं मतही पाटील यांनी व्यक्त केले.

'सध्याचे संकट पाहता दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ऑक्सिजन बेडसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सुविधा निर्माण करताना तेथे वैद्यकीय, निमवैद्यकीय व पूरक सेवा देण्याची कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सर्वांनाची एक वर्षांसाठी नियुक्ती करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला.

त्याचसोबत कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1100 रुग्ण बरे झाले आहेत. आजही 400 रुग्ण उपचार घेत आहेत. असे असतानाही आजपर्यंत 6 महिन्यामध्ये सरकारकडून त्यांना फक्त 44 हजार रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा तरी कशी ठेवायची?, असा सवालही पाटील यांनी उपस्थितीत केला.

First published:

Tags: Corona, Maharashtra, चंद्रकांत पाटील, भाजप