अकोला, 5 जून: अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बळवंत कॉलनीत भगत दाम्पत्याचे जळीत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. माहिती खदान पोलिसांना मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. हेही वाचा.. कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतक भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून त्यांच्या मृत्युचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास खदान पोलिस करत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते. घरात आग लागून जीव गुदल्यामुळे भगत दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, घात की अपघात? याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा… कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर भगत यांच्या नातेवाईकांचा पोलिसा शोध घेत आहेत. सेवानिवृत्तीनंतर उपजिल्हाधिकारी भगत हे पत्नीसह बंगल्यात राहात होते. त्यांच्याकडे फारसं कोणी येत जात नव्हतं अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.