जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

नांदेड-वसमत मार्गावर हा अपघात झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कन्हैया खंडेलवाल, (प्रतिनिधी) हिंगोली, 5 जून: हिंगोली जिल्ह्यातील निळा-एकदराजवळ शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये वसमतचे प्रतिष्ठीत व्यापारी तथा भाजपाचे नगरसेवक संजय काबरा यांचे सुपुत्राचा समावेश आहे. हेही वाचा..  नियम पाळतील ते ठाणेकर कसले, Unlock 1 चेही नियम तुडवले पायदळी कोनाथा (ता.वसमत) येथील माधव बेंडे, शिवकुमार बेंडे व वसमत येथील व्यापारी धीरज काबरा हे तिघेजण नांदेडहून वसमतला येत होते. दरम्यान नांदेड-आसेगाव मार्गावरील निळा- एकदरा गावाच्या जवळ शुक्रवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास झाडावर कार अदळून अपघात झाला. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, रस्त्याच्या शेजारील झाड मुळासकट जमिनीवर उपटून पडले. या अपघातात समोर बसलेले माधव बेंडे व धीरज काबरा यांचा जागेवरच मृत्यू झाला. शिवकुमार बेंडे हे जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की गाडीतील समोरचे दोन्ही एअर बॅग फुटून बाहेर आले. धीरज काबरा (वय-30) हे वसमतचे प्रतिष्ठीत व्यापारी तथा भाजपाचे नगरसेवक संजय काबरा यांचे सुपुत्र होते. काबरा यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आहे, तर दुसरे मयत माधव बेंडे (वय-47 हे कोनाथा येथील प्रतिष्ठीत शेतकरी असून ते वसमत येथील बहिर्जीनगर भागात राहत होते. त्‍यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असुन एक मुलगा शिकत आहे तर दुसरा शेती करतो. जखमी शिवकुमार बेंडे यांच्या नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा…  corona : वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांनी तिला दिली होती मोजून 3 मिनिटं मयत माधव बेंडे व धीरज काबरा यांचे वसमत येथील उपजिल्हा रूग्ण्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. माधव बेंडे यांच्यावर कोनाथा तर धीरज काबरा यांच्यावर वसमत येथील अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

News18

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात