कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर

कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर

कोरोना विषाणूची कहर दिवसेंदिवस वाढत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 5 जून: कोरोना विषाणूची कहर दिवसेंदिवस वाढत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांची आता खैर नाही. रुग्णांकडून जास्त बिल आकारणारे हॉस्पिटल आता शारणाच्या रडारवर आहेत.

ज्या रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णाकडून घेतली असेल तर अशी रक्कम त्या रुग्णालयांकडून परत घेतली जाणार आहे.

हेही वाचा.. कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

कोरोनाबाधित रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने आहेत विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. शासनाच्या अध्यादेशाच उल्लंघन करत दर आकारणारे रुग्णालये आता शासनाच्या रडारवर आले आहेत. शासनाच्या या कारवाईमुळे आता कोरोनाबाधितांची लूट करणाऱ्या रुग्णालय आणि डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

राज्य सरकारने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी 13 मार्च 2020 ला साथीरोग प्रतिबंधक कायद्याखाली स्वतंत्र अधिसूचना काढत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना उपचाराच्या खर्चाच एक दर पत्रक निश्चित करून दिलं होतं. मात्र, राज्यभरातील अनेक खासगी रुग्णलंयानी कोरोनाबाधीत रुग्णांकडून निश्‍चित करून दिलेल्या दरपत्रकातील रकमेपेक्षा अधिक रकमेचे बिल वसूल केले होते. मात्र, आता या प्रकाराविरुद्ध तक्रारीनंतर राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णाकडून उपचार घेतल्यानंतर वसूल केलेले अतिरिक्त बिल पुन्हा वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या साठी शासनाने राज्यातील सर्वच महापालिकांना तशा सुचना देखील दिल्या आहे. या सूचनांनंतर आता नाशिक महापालिकेनेही अशा हॉस्पिटलची यादी तयार करत रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्तचे पैसे पुन्हा वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे हा अतिरिक्त बिल वसुलीचा राज्यातील आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता असल्याचे नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन गमे यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.या शिवाय ज्या खासगी रुग्णालयांकडून कोरोना बाधित रुग्णांची लूट झाली होती अशा रुग्णांनाही या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे.या शिवाय जे रुग्णालय पुढील काळात शासनाने ठरवून दिलेल्या दर पत्रकाप्रमाणे बिल आकारणी करणार नाही अशा रुग्णालयांना शासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

हेही वाचा.. मोदी सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय, सर्व नव्या सरकारी योजनांवर लावला ब्रेक

मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या स्थानिक प्रशासनावर आहे त्या प्रशासनाने ही कारवाई करत असताना रुग्णालयां बरोबर आर्थिक हितसंबंध जोपासून कारवाई बाबत टाळाटाळ करू नये हीच सामान्यांना अपेक्षा आहे.

First published: June 5, 2020, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading