मुंबई, 24 जून : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ईडीच्या चौकशीवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्राच्या राजधानीची लूट सुरू असून, मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक पार पडली या बैठकीला मेहबुबा मुफ्ती या देखील उपस्थित होत्या. यावरून भाजपनं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मेहबुबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो दाखवला आहे. ज्यामध्ये मुफ्ती आणि पंतप्रधान मोदी हे सोबत असल्याचं दिसून येत आहे. मोदींच्या फोटो नंतर उद्धव ठाकरे यांनी आणखी एक फोटो दाखवला. ज्या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुफ्ती यांची भेट घेत असल्याचं दिसून येत आहे. Breaking news : राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा, जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ? ’…ते जनताच ठरवेल’ पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही ईडीच्या चौकशीला घाबरत नाहीत. लक्षात ठेवा आम्ही सुद्धा तुमची चौकशी करू, मिळेल तिथे खा ही आमची संस्कृती नाही. मी नायक की खलनायक हे जनताच ठरवेल. मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्याच्या महापालिकेची देखील चौकशी झाली पाहिजे. आम्ही येत्या एक तारखेला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.