मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले', उद्धव ठाकरे ठाण्यात कडाडले, शिंदेंना ओपन चॅलेंज

'निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले', उद्धव ठाकरे ठाण्यात कडाडले, शिंदेंना ओपन चॅलेंज

'सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा सुरू आहे. तो समोर दिसत असून सुद्धा शिवसेना मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही.

'सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा सुरू आहे. तो समोर दिसत असून सुद्धा शिवसेना मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही.

'सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा सुरू आहे. तो समोर दिसत असून सुद्धा शिवसेना मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 26 जानेवारी : 'निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली. गेले ते जाऊ द्या, जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत आहे, ते उद्या मशाल पेटवणार आहे' ठाण्यात लवकरच विराट सभा घेणार आहे' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं.  यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

'मी आज भाषण करण्यासाठी इथं आलो नाही. पण, लवकरच नक्की भाषणासाठी येणार आहे. त्याचं कारण मी आज आरोग्य शिबिर आणि एक दोन कार्यक्रमासाठी आलो आहे. ठाणेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. उद्या मी ठाणेकरांची राजकीय काळजी घेण्यासाठी येणार आहे' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात मोठी सभा घेणार असल्याचे जाहीर केलं.

(जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटील म्हणाले...)

'सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा सुरू आहे. तो समोर दिसत असून सुद्धा शिवसेना मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही. अन्यायावर लाथ मारण्याचे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचे काम राजन विचारे यांनी केलं आहे. अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहे, ते इथं आहे. आणि जे विकले गेले ते काय भावाने विकले गेले ते सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणताच 50 खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजीच कार्यकर्त्यांनी केली.

(अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक लवकरच..; विखे पाटलांचा मोठा दावा)

'राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये सुरू आहे. संजय राऊत तिथे गेले होते. तिथे सुद्धा 50 खोके अशी घोषणा ऐकायला मिळाली. त्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली. गेले ते जाऊ द्या, जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत आहे, ते उद्या मशाल पेटवणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'जागतिक संकट होतं, त्यावेळी मी जबाबदारी सांभाळली. त्यावेळी सगळी मंदिरं बंद होती, पण डॉक्टर सेवेसाठी हजर होते. डॉक्टरांनी आपल्याला सर्वांना वाचवलं आहे, असंही कौतुकही उद्धव ठाकरेंनी केलं.

First published:

Tags: Uddhav tahckeray