मराठी बातम्या /बातम्या /पुणे /जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटील म्हणाले...

जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटील म्हणाले...


'जयंत पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. असे गौप्यस्फोट त्या त्यावेळी का केले जात नाही.

'जयंत पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. असे गौप्यस्फोट त्या त्यावेळी का केले जात नाही.

'जयंत पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. असे गौप्यस्फोट त्या त्यावेळी का केले जात नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 26 जानेवारी : 'असे गौप्यस्फोट त्या त्या वेळी का केले जात नाही. उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही', अशी प्रतिक्रिया देत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचा दावा फेटाळून लावला.

पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

'जयंत पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. तो गौप्यस्फोट त्या त्यावेळी का केले जात नाही. मुळात उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही, असं पाटील म्हणाले.

(प्रकाश आंबेडकर म्हणतात शरद पवार भाजपचे, जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं)

'देवेंद्र असे नेते झाले त्यांनी लहान वयात विश्वासार्हता मिळवली आहे. ज्या अर्थी देवेंद्र म्हणत आहेत म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अलीकडे राज्यातील असे नेते झाले की लहान वयात त्यांनी विश्वास जपला ते माहिती नसताना काही बोलत नाहीत . माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो, असंही पाटील म्हणाले.

'२०१४ मध्ये मी आणि धर्मेंद्र प्रधान होतो पण तेव्हा युती तुटली तेव्हा माझा स्वभाव आहे की मला जेवढं सांगितले आहे तेवढं काम करतो. राजकीय जीवनात सगळ्यांनी महत्वकांक्षी असावं पण पाय कापायचे नसतात. काही जण होते पुण्यातले की ज्याचे मुख्यमंत्रिपद फिक्स होतं पण ते उशिरा पोहचले, असंही पाटील म्हणाले.

(केसरकरांकडून आदित्य ठाकरेंना संयमाचा सल्ला, ठाणे दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना टोला)

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. तुमच्या कानावर जशी चर्चा आहे तशी चर्चा माझ्या कानावर आली आहे. तुम्हाला काही कळलं तर मलाही कळवा, अशी मिश्किल टिप्पणीही पाटील यांनी केली.

शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली आहे. पण काळ ठरवेल किती काळ ते एकत्र राहणार. एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास आहे, असा टोलाही पाटील यांनी सेनेला लगावला.

First published:

Tags: Chandrakant patil