अहमदनगर, 26 जानेवारी : विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार भाजपकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील असाच दावा केला होता. विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असल्यानं आम्हाला बहुमताची चिंता नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील असाच दावा केला आहे. जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते सध्या भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना, केवळ अहमदनगर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील अनेक मंडळी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, कारण अन्य राजकीय पक्षांत त्यांना आता भविष्य उरलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Pathan: ..तेव्हा प्रेक्षकांना हुसकावणारे आव्हाड आज मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपले? पठाणवरून मनसेचा हल्लाबोल
पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
दरम्यान पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. जयंत पाटील नेमके कोणत्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP