मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे' उदयनराजे संतापले, पाहा VIDEO

'क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे' उदयनराजे संतापले, पाहा VIDEO

'क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे' उदयनराजे संतापले, पाहा VIDEO

'क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे' उदयनराजे संतापले, पाहा VIDEO

Udayanraje angry over bad condition of sports complex: क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेवरुन खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सातारा, 23 ऑक्टोबर : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी साताऱ्यातील क्रीडा संकुलाच्या (Satara Sports complex) दुरवस्तेवरुन आक्रमक होत टीका केली आहे. क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्यांन मारलं पाहिजे, मुस्काडलं पाहिजे असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. अजित पवार पालकमंत्री असताना क्रीडा संकुलाचं काम झालं होतं त्यामुले उदयनराजे भोसले यांचा रोख हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. जोड्याने मारलं पाहिजे त्यावेळेस कोण पालकमंत्री आणि जे जे आमदार होते मला त्यावेळी विरोध केला ना... आणि असं दाखवलं की मी विरोध करतोय कारण नसताना... कोणी केलं आहे हे सर्वांना माहिती आहे. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

स्पोर्ट्स आणि राजकारण हे एकत्र आणू नये. यातून सगळ्यांनी बोध घ्यायला हवा. राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. मुसकडलं पाहिजे यांना ऐन मोक्या वरची जागा वाया घालवली. असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका उडवला आहे. यावरुन काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टर बाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

'उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे साताऱ्याची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताऱ्याच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं, असा सणसणीत टोला शिवेंद्रराजे यांनी लगावलेला.

तसंच, सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची ही नौटंकी सुरू आहे, लोक सुज्ञ असून त्यांना सर्व काही माहिती असल्याचा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला होता.

'ED ने महाराष्ट्रात यावं, पण एका अटीवर...' उदयनराजेंनी घातली अट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी (ED), सीबीआय (CBI)कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते मविआ सरकारमधील नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी ईडी समोर एक अट ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी म्हटलं, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं... पण एका अटीवर... कारवाई करणार असाल तर नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Satara, Udayanraje bhosale