सातारा, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी (ED), सीबीआय (CBI)कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते मविआ सरकारमधील नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी ईडी समोर एक अट ठेवली आहे. काय म्हणाले उदयनराजे भोसले? भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं… पण एका अटीवर… कारवाई करणार असाल तर नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे. वाचा : NCB गुन्हेगारांना कसं काय नियुक्त करते? शरद पवारांचाही जोरदार हल्लाबोल उदयनराजे पुढे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात पोलीस आणि सरकारी वकिलांनी एक गंभीर प्रकार केला. न्यायालयाची दिशाभूल करून गंभीर कलम असलेल्या आरोपीला जमीन मिळाला. पोलीस, सरकारी वकील आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी संगणमंताने हे केलं. लोकप्रतिनिधींचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. हे लोकशाही ला मारक आहे. काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात. त्यांना निवडून आणतात, त्यांच्या मार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न होतोय. असंच चालू राहील तर जंगलराज येईल. लोकप्रतिनिधी यांनी ओळखावं उद्या तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. ‘मला ईडीची नोटीस पाठवल्यावर महाराष्ट्राने भाजपाला वेडी ठरवलं’ : शरद पवार राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाष्य केलं होतं. सोलापूर येथील मेळाव्यात शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले… पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणात मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी पद घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस पाठवली. मला ईडीची नोटीस दिली, मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संपूर्ण महाराष्ट्राने भाजपला वेडी ठरवली असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







