Home /News /maharashtra /

आपलं घराणं कुठलं? आणि आपण..., शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

आपलं घराणं कुठलं? आणि आपण..., शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल


सातारा सर्किट हाऊसवर उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शिवेंद्रराजे म्हणाले की...

सातारा सर्किट हाऊसवर उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शिवेंद्रराजे म्हणाले की...

सातारा सर्किट हाऊसवर उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शिवेंद्रराजे म्हणाले की...

सातारा, 12 ऑक्टोबर :  सातारा नगरपालिका निवडणुकीच्या (Satara municipal elections) पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका उडवला आहे. यावर शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टर बाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसंच, आपलं घराणं कुठलं? असा सवाल करत रामराजेंच्या भेटीवर शिवेंद्रराजेंनी टोलाही लगावला. आज पत्रकारांशी बोलत असताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. 'उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे साताऱ्याची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताऱ्याच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं, असा सणसणीत टोला शिवेंद्रराजे यांनी लगावला. अय्यो! भल्या पहाटे टॉयलेटमध्ये घुसली महिला, समोरचं चित्र पाहून किंचाळत आली बाहेर तसंच, सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची ही नौटंकी सुरू आहे, लोक सुज्ञ असून त्यांना सर्व काही माहिती असल्याचा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला. सातारा सर्किट हाऊसवर झालेल्या उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, 'ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतो ची भाषा केली त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? छत्रपती घराणे आहे असा खोचक टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला. आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही जीवघेणा ठरणारा दुधी कसा ओळखायचा ? खासदार उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असं नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. मग 10 वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्री यांनी भेट दिली नाही का? की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहीत नव्हता असा खोचक सवालही शिवेंद्रराजे यांनी विचारला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: उदयनराजे भोसले

पुढील बातम्या