#raju shetty

Showing of 1 - 14 from 332 results
VIDEO : मंत्रालयाबाहेर आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 25 आंदोलक ताब्यात

बातम्याNov 4, 2019

VIDEO : मंत्रालयाबाहेर आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 25 आंदोलक ताब्यात

मुंबई, 04 नोव्हेंबर: प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.