जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू

धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू

धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3000 जवळ पोहोचली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कल्याण, 19 जून: कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) कोरोनाच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा करत आहे. मात्र, कल्याणमध्ये दोन रुग्णांचा उपचाराअभावी रुग्णालयासमोरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाला उपचारासाठी बेड मिळाला नाही तर दुसऱ्याला वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. हेही वाचा… कोरोनाला हरवण्यासाठी खास डाएट प्लॅन; पोलीस कोरोनामुक्त झाल्याचा दावा मिळालेली माहिती अशी की, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3000 जवळ पोहोचली आहे. महापौर विनिता राणे, केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दावा केला होता की, कोरोना विरोधातील लढ्यासाठी केडीएमसी सज्ज आहे. कुठेही कमतरता नाही. कल्याणमध्ये दोन जणांचा दुदैवी मृत्यूनंतर संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे. या दोघांना वेळेवर उपचार मिळाला नाही. एका रुग्णाची प्रकृती चार दिवसांपासून बिघडली होती. त्याची कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यांना गुरुवारी श्वास घेण्यास त्रस होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या कोविड होली क्रॉस रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचा रिपोर्ट प्राप्त नसल्याने रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांना घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात घेऊन आले. त्याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरी घटना कल्याण (पूर्व) मधील आहे. जनार्दन डोळस यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रुक्म्णिबाई रुग्णालयात आणलं. त्याठिकाणी ऑक्सिजन सुविधा नसल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेत मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बेडसाठी धावपळ केली होती. हेही वाचा… दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, Covid-19 साठी प्लाझ्मा थेरपी देणार केडीएमसी व खासगी रुग्णालयात मदत मिळाली नाही. उपचार घेताना एखादी व्यक्ती मरण पावते. मात्र, उपचाराअभावीच रुग्णालयासमोरच मरते. मुंबईजवळ असलेल्या कल्याण-डोंबिवलीत अशी घटना घडते ही बाब प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी असल्याचं समाजसेवक उदय रसाळ यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात