नवी दिल्ली, 19 जून: दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) यांना निमोनिया झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली आहे. सत्येंद्र जैन यांना पुढील उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) हलवण्यात येत आहे. तिथे त्यांना कोविड-19 ( COVID-19)साठी प्लाझ्मा थेरेपी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा… लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले… जान है तो जहान है दिल्ली आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेली माहिती अशी की, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Delhi Minister Satyendar Jain being shifted to Saket's Max Hospital, where he will be administered Plasma therapy for COVID19. https://t.co/ct4Yu3heT9
— ANI (@ANI) June 19, 2020
राजीव गांधी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनुसार, 55 वर्षीय आरोग्यमंत्र्यांना निमोनिया झाला आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. काय म्हणाले मुख्यमंत्री ? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा सीटी स्कॅन रिपोर्ट आला आहे. सत्येंद्र जैन यांच्या फुप्फुसात निमोनियाचं इन्फेक्शन झालं आहे. त्यांची प्रकृती सकाळी स्थीर होती. मात्र, अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा गुरुवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सत्येंद्र जैन यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. हेही वाचा… कोरोनाला हरवण्यासाठी खास डाएट प्लॅन; पोलीस कोरोनामुक्त झाल्याचा दावा आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाल्याची त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्य मंत्र्यालयाची अतिरिक्त जबाबदारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आली आहे.