अरुण कुमार त्रिवेदी/इंदोर, 19 जून : कोरोनाग्रस्त रुग्णांवर विविध औषधांचं ट्रायल तर सुरूच आहे. यापैकी काही औषधं प्रभावी ठरत असल्याचंही दिसून आलं आहे. मात्र आता कोरोनाला हरवण्यासाठी एक खास डाएट प्लॅन (diet plan) तयार करण्यात आला आहे आणि या डाएट प्लॅनमुळे कोरोनाग्रस्त पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी हा खास डाएट प्लॅन तयार केला आहे तो इंदोरचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) हरीनारायणचारी मिश्र यांनी. व्हिएतनाम, कंबोडियामध्ये अशा डाएट प्लॅनमुळे कोरोना रुग्ण बरे झालेत. जेव्हा इंदोरमधील एका पोलीस जवानावर याचा प्रयोग करण्यात आला, तेव्हा त्याचा परिणाम चांगला दिसून आला आहे, अशी माहिती हरीनारायणचारी मिश्र यांनी दिली.
डीआयजी हरीनारायणचारी मिश्र यांनी सांगितलं, "एका पोलीस जवानाला ताप आला होता. तेव्हा त्याला नारळपाणी, व्हिटॅमिन सी असलेले ज्युस, मोसमी फळं, आंबट फळं, गाजरांचा ज्युस देण्यात आला. त्याचा ताप दोन दिवसांत बरा झाले. जवानाला होम क्वारंटाइन केल्यानंतर त्याच्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे. हा आहार घेतल्यानंतर चार दिवसात त्याच रिपोर्ट नेगेटिव्ह आला"
हे वाचा - WHO ने दिली खूशखबर; या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार कोरोनाची लस
"अशाच पद्धतीचा आहार इतर कोरोनाग्रस्त 45 पोलीस कर्मचाऱ्यांनाही देण्यात आला. तेदेखील बरे झाले. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली नाही", असंही डीआयजी मिश्र यांनी सांगितलं.
कसा आहे हा डाएट प्लॅन
पहिल्या दिवशी व्हिटॅमिन सी असलेले ज्युस म्हणजे लिंबूपाणी, संत्री-मोसंबी ज्युस आणि नारळपाणी देण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी गाजर, काकडी, अंडं, दूध, दिवसा चहा आणि गरम पाण्यातील काढा दिला जातो
तिसऱ्या दिवशी प्रोटिनयुक्त पदार्थ जसं की ड्रायफ्रुट्स, बिया, बटाटा, भात आणि फळं दिली.
अशाच पद्धतीने दररोज आहार घेऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
कोरोना रुग्णालयातही लागू केला जाणार हा डाएट प्लॅन
डीएसपी संतोष कुमार उपाध्याय यांनी सांगितलं, "कोरोनाच्या परिस्थितीतही पोलीस कर्मचारी आपली ड्युटी बजावत आहेत. यावेळी ते स्वत:कडे लक्ष देऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहिल आणि त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होईल. डीआयजींनी तयार केलेल्या या डाएट प्लॅनचं सर्वांनी स्वागत केलं आहे. लवकरच हा डाएच प्लॅन रुग्णालयताही लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे"
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही भरपगारी मासिक पाळी रजा