जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भरधाव ट्रकची पोलिसांच्या चौकीला भीषण धडक, अधिकाऱ्यांनी वेळीच मारल्या उड्या

भरधाव ट्रकची पोलिसांच्या चौकीला भीषण धडक, अधिकाऱ्यांनी वेळीच मारल्या उड्या

भरधाव ट्रकची पोलिसांच्या चौकीला भीषण धडक, अधिकाऱ्यांनी वेळीच मारल्या उड्या

पोलीस चौकीला धडक देऊनही ट्रक थांबला नाही, पुढे जाऊन रस्त्याच्या कडेल्या असलेल्या हॉटेलमध्ये घुसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनमाड, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. या प्रार्श्वभूमीवर लोकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंद असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु, मनमाडमध्ये नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांचा जीव थोडक्यात बचावला. एका भरधाव ट्रकने थेट नाकाबंदीसाठी असलेली चौकीला धडक दिली. राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या असून या ठिकाणी पोलीस पहारा देत आहे. मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे-इंदुर महामार्गाजवळ असलेल्या पोलीस नाकाबंदी चौकीवर आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. हेही वाचा - लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म नाकाबंदी असताना अचानक एक ट्रक भरधाव वेगाने येत होतो. पोलिसांनी दूर न येणाऱ्या या ट्रकला थांबण्याची सूचना केली पण ट्रक काही थांबला नाही. प्रसंगावधान राखत पोलीस चौकीवर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच बाजूला उड्या मारल्या. काही सेंकदात ट्रक पोलीस चौकीला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, पोलीस चौकी उद्ध्वस्त झाली. पोलीस चौकीला धडक देऊनही ट्रक थांबला नाही, पुढे जाऊन रस्त्याच्या कडेल्या असलेल्या हॉटेलमध्ये घुसला.  सुदैवाने लॉकडाउनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. हेही वाचा - दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाली आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: manmad , police , truck
  • First Published :
जाहिरात
जाहिरात