दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ

दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ

शनिवारी या भागातील सी ब्लॉकमध्ये एकाच कुटुंबातील 31 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना नरेला येथील क्वारंटाईन सेंटरवर पाठवले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं असतानाही कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. दिल्लातील जहांगीरपुरीमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे काही थांबत नाहीत. शनिवारी या भागातील सी ब्लॉकमध्ये एकाच कुटुंबातील 31 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना नरेला येथील क्वारंटाईन सेंटरवर पाठवले आहे. सर्व पीडित महिला कोरोना-बाधित महिलेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला आहे. जहांगीरपुरीचा सी ब्लॉक आणि बी ब्लॉक यापूर्वीच कंटेनमेंट झोन (सील झोन) म्हणून घोषित करण्यात आला होता.

सर्वजण संक्रमित महिलेच्या आले संपर्कात

जहांगीरपुरीच्या सी ब्लॉकमध्ये राहणारी 54 वर्षीय राम मनोहर लोहिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील चिकित्सकांनी कोरोना तपासणीसाठी नमुने घेतले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या नातेवाईकांनी 6 एप्रिल रोजी अंतिम संस्कार केले. 8 एप्रिल रोजी महिलेचा अहवाल आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घाईघाईत त्यांच्या 15 कुटुंबियांना नरेलाच्या क्वारंटाईनमध्ये ठेवले.

यासह, लोकांमध्ये कोरोना तपासण्यासाठी संपूर्ण सी ब्लॉक सील केला गेला आणि सर्वेक्षण केले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सी ब्लॉक आणि आसपासच्या भागातील 82 लोकांचे कोरोनाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी सी ब्लॉकमधील 31 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जहांगीरपुरी बनली हॉटस्पॉट

जहांगीरपुरीच्या ब्लॉक सीमध्ये कोरोनाची 31 प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. काही दिवसांपूर्वी बी ब्लॉकमध्ये चार प्रकरणे आढळली. अधिकाऱ्यांनी संपूर्ण ब्लॉक सील केले आणि घरोघर सर्वेक्षण केले. आता चारही पीडित लोक बरे झाले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जहांगीरपुरीमध्ये येत्या दोन आठवड्यांत अत्यंत महत्त्वाचे आहे. अद्याप बऱ्याच जणांचा तपास अहवाल आला नाही.

First published: April 19, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या