दुर्धर आजारानं झालं वडिलांचं निधन, 12 व्याला वाहिली कुटुंबीयांनी अनोखी श्रद्धांजली

दुर्धर आजारानं झालं वडिलांचं निधन, 12 व्याला वाहिली कुटुंबीयांनी अनोखी श्रद्धांजली

दुर्धर आजारानं निधन झालेल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्याणमधील सकपाळ कुटुंबीयांनी एक आदर्शवत असा निर्णय घेतला.

  • Share this:

कल्याण, 29 जून: दुर्धर आजारानं निधन झालेल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्याणमधील सकपाळ कुटुंबीयांनी एक आदर्शवत असा निर्णय घेतला. वडिलांच्या बाराव्याला रक्तदान शिबीर आयोजित करून त्यांना अत्यंत अनोख्या आणि सामाजिक बांधिलकी जपून श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा...मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात

कल्याणच्या रामबाग परिसरात राहणारे उदय सकपाळ यांचं 17 जून रोजी अप्लास्टिक अॅनिमिया या दुर्धर आजारानं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. या आजारामध्ये त्यांना सतत रक्ताची गरज भासत होती. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून कोरोना आणि सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा फटका उदय सकपाळ यांच्यासारख्या रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना सहन करावा लागला.

एकीकडे वडिलांच्या शरीरातून कमी होत जाणाऱ्या प्लेटलेट्स आणि दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे असलेली रक्ताची कमतरता अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडलं होतं. आणि त्यातच वडिलांचं निधन झालं.

वडिलांसाठी रक्त गोळा करताना आम्हाला जो त्रास झाला. ज्या अडचणी आल्या त्या इतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना येऊ नये या विचारातून सकपाळ कुटुंबीयांनी वडिलांच्या बाराव्यालाच रक्तदान शिबीर घेण्याचा आणि त्याद्वारे वडिलांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. 28 जून रोजी झालेल्या या रक्तदान शिबिरात सकपाळ कुटुंबीयांसह त्यांच्या मित्र परिवारातील 36 जणांनी रक्तदान करून उदय सकपाळ यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा...कोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला- पप्पा, श्वास घेता येत नाही आणि..

अतिशय गंभीर प्रसंगातही सकपाळ कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे परिसरात सकपाळ कुटुंबाचं कौतुक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी यंगिस्तान फाऊंडेशन, साथी फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बँकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

First published: June 29, 2020, 1:55 PM IST
Tags: kalyanKDMC

ताज्या बातम्या