मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला - पप्पा, श्वास घेता येत नाहीये आणि...

कोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला - पप्पा, श्वास घेता येत नाहीये आणि...

एका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.

एका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.

एका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.

    हैदराबाद, 29 जून : देशात कोरोना रुग्णांचा (Covid-19 Patient) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातला कोरोनाने 5 लाख 50 हजारांवर पोहोचला आहे. या महामारीने अनेकांचे जीव घेतले. अशात कोरोना रुग्णाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इतका वेदनादायी आहे की तो आम्ही तुम्हाला दाखवूही नाही शकत. यामध्ये एका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.

    मीडिया रिपोर्टनुसार, हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रवी कुमार नावाच्या कोरोना रूग्णाचं शुक्रवारी निधन झालं. याआधी त्याने कुटुंबाला व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ मेसेजनुसार, मृत्यूच्या आधी रवी म्हणाला होता- 'बाबा, मला श्वास घेता येत नाहीये. ऑक्सिजन उपलब्ध नाही. पप्पा बाय बाय… ’

    कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट

    दरम्यान, हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी व्हेंटिलेटर काढून टाकलं होतं. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता आणि हृदयाचा ठोका थांबत असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या मुलाने तीन तास त्रास सहन केला आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचं कुटुंबाने म्हटलं आहे.

    मुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार

    रवीचे वडील व्यंकटेश यांनी एक सेल्फी व्हिडिओ माध्यमांमध्ये शेअर करून तेलंगणा सरकारच्या ढिसाळ कारभारावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले की , 'माझ्या मुलाला 100-101 अंशं ताप होता. 23 रोजी जेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. तेव्हा कोविड -19 ची लक्षणं असल्याचं सांगितलं गेलं. पण रुग्णालयाकडून दुर्लक्ष करण्यात आलं.'

    संपादन - रेणुका धायबर

    First published:

    Tags: Corona virus, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus in india