मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खरी शिवसेना कोणाची आजच होणार निर्णय? निकालाकडे राज्याचं लक्ष

खरी शिवसेना कोणाची आजच होणार निर्णय? निकालाकडे राज्याचं लक्ष

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

आज शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गट धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं पाठवणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 जानेवारी :  आज शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गट धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं पाठवणार आहेत. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला मेल पाठवण्यात येणार आहे. तर शिंदे गटाकडून देखील निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणण पाठवण्याबाबत तज्ज्ञ वकिलांंशी चर्चा सुरू आहे. शिंदे गट देखील आज आपलं म्हणण लेखी स्वरुपात निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेनेवर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं चिन्हा गोठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आता लवकरच अंतिम  निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

निर्णयाबाबत दोन शक्यता  

दरम्यान चिन्हाच्या निर्णयाबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे आज दोन्ही गटाने आपलं म्हणण लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आजच धनुष्यबाणाबाबत निर्णय होऊ शकतो. किंवा निवडणूक आयोग चिन्हाबाबतचा निर्णय राखून देखील ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस ठाकरे आणि शिंदे गट तसेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

हेही वाचा : Nashik MLC Election : भाजपने पाठिंबा दिला का? सुधीर तांबे नेमकं काय म्हणाले?

दोन्ही पक्षांकडून दावा 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील सर्वाधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुळ शिवसेना म्हणून चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Election commission, Shiv sena, Uddhav Thackeray