मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MLC Election : सत्यजीत तांबेंसाठी घडणार का चमत्कार? आज महत्त्वाचा दिवस

MLC Election : सत्यजीत तांबेंसाठी घडणार का चमत्कार? आज महत्त्वाचा दिवस

आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी मतदान होणार आहे. नाशिकच्या जागेकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी मतदान होणार आहे. नाशिकच्या जागेकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी मतदान होणार आहे. नाशिकच्या जागेकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी मतदान होणार आहे.  यंदा नागपूर आणि नाशिक विधान परिषदेच्या जागेकडे सर्व राज्याचं लक्ष लगालं आहे.  पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. नाशिकमध्ये काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हातात एबी फॉर्म असूनही सुधीर तांबे यांनी फॉर्म भरला नाही, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दखल केली. यावरून काँग्रेस नेतृत्व नाराज झालं, पक्षादेश डावलल्यानं सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर महाविकास आघाडीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

नाशिकमध्ये तांबेंविरूद्ध पाटील समाना

महाविकास आघाडीने नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानं त्याचं पारड जड झालं. मविआनं आपली भूमिका जाहीर केल्यानंतर भाजप या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन करत आपले कार्यकर्ते त्यांना मतदान करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच विखेंच्या कार्यकर्त्यांनी तांबे यांचा प्रचार देखील केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : mlc election : सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा? विखे पाटलांनी सांगितलं मतदानाचं गणित

नागपूरमध्ये चूरस  

तर दुसरीकडे नागपूर शिक्षक मतदारसंघात देखील मोठी चूरस पहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी आज मतदान होणार आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले, भाजप समर्थित नागो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतदानला सुरुवात होणार आहे. मतदारांना सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल. तर गडचिरोलीमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

First published:

Tags: BJP, NCP