Home /News /national /

भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला, आणखी काही प्रवासीही पळाले

भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला, आणखी काही प्रवासीही पळाले

दक्षिण आफ्रीकेचा (South Africa) एक 66 वर्षीय नागरीक कर्नाटकात ओमायक्रोन पॉझिटिव्ह (Omicron Positive) आढळला होता. तोच नागरीक पळून गेला आहे. तो 20 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून आला होता.

  बंगळुरु, 3 डिसेंबर : जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घालणारा कोरोनाचा नवा ओमायक्रोन (Omicron) विषाणू भारतात (India) देखील पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यात दोन जणांना ओमाक्रोनची लागण झाल्याची माहिती काल समोर आली होती. त्या दोघांपैकी एक ओमायक्रोन पॉझिटिव्ह (Omicron Positive) रुग्ण हॉटेलमधून पळून गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे विमानतळावर विदेशातून दाखल झालेल्यांपैकी 10 प्रवासी देखील पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रवाशांचा देखील शोध सुरु असल्याची माहिती कर्नाटकचे मंत्री आर अशोक यांनी दिली आहे. "कथित बेपत्ता झालेल्या त्या 10 नागरिकांचा आज रात्रीपर्यंत शोध लागायला हवा. त्यानंतर त्यांची टेस्ट केली जाईल", असं देखील मंत्री अशोक यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या दहा नागरिकांनी मोबाईल स्वीच ऑफ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क होऊ शकत नाहीय.

  पळालेल्या ओमायक्रोनबाधिताची ट्रव्हेल हिस्ट्री काय?

  "दक्षिण आफ्रीकेचा एक 66 वर्षीय नागरीक ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळला होता. तोच नागरीक पळून गेला आहे. तो 20 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यानंतर सात दिवसांनी दुबईला रवाना झाला होता. ज्यादिवशी तो दक्षिण आफ्रिकेतून विमानतळावर दाखल झाला तेव्हा त्याने लस घेतल्याचं कागदपत्रात स्पष्ट होते. त्यादिवशी त्याची हॉटेलमध्ये टेस्ट केली तर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. पण तो सोबत एक निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आला होता", अशी माहिती मंत्री अशोक यांनी दिली. हेही वाचा : हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार, नाना पटोलेंची घोषणा "जेव्हा सरकारी वकील त्याला भेटण्यासाठी गेले होते तेव्हा तो ए सिम्पटेमॅटिक असल्याचं समोर आलं होतं. डॉक्टरांनी त्याला सेल्फ आयसोलेट होण्याची सूचना दिली होती. तो हाय रिस्क देशांमधील नागरीक असल्याने त्याची 22 नोव्हेंबरला पुन्हा टेस्ट करण्यात आली होती. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या 24 लोकांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला होता. तसेच अधिकाऱ्यांनी 240 सेकेंडरी कॉन्टॅक्ट शोधून काढले होते. पण त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला होता", अशी देखील माहिती मंत्री अशोक यांनी दिली. हेही वाचा : काय! कोरोनाचा भयंकर Omicron Variant उंदरांमधून आला आहे?

  'तो' पळून गेल्यानंतर ओमायक्रोनबाधित असल्याचं उघड

  या दरम्यान कोरोनाबाधित 66 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा नागरीक 27 नोव्हेंबरला मध्यरात्री हॉटेलमधून निघाला होता. त्याने 23 नोव्हेंबरला एका प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट त्यात निगेटिव्ह आला होता. तोच रिपोर्ट दाखवून तो 27 नोव्हेंबरला मध्यरात्री हॉटेलमधून पळून गेला. त्याने त्यादिवशी रात्री कॅब बुक केली होती. त्यानंतर तो दुबईच्या फ्लाईटने रवाना झाला होता. तो दुबईत निघून गेल्यानंतर त्याला ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती समोर आली, असं मंत्री अशोक यांनी सांगितलं.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या