ATM मध्ये पैसे काढण्यासाठी मुलगा जाताच हल्लेखोराने साधला डाव, आईसोबत केलं असं

ATM मध्ये पैसे काढण्यासाठी मुलगा जाताच हल्लेखोराने साधला डाव, आईसोबत केलं असं

नवी मुंबईतील उलवा इथं भरदिवसा एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी मुंबई,2 मार्च: नवी मुंबईतील उलवा इथं भरदिवसा एका महिलेचे अपहरण करून तिची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. उलवा येथील सेक्टर 24 मध्ये ही घटना घडली आहे. प्रभावती भगत असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रभावती भगत या आपल्या मुलासोबत लग्नाला कारने निघाल्या होत्या. वहाळ गावाजवळील अभ्युदया बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी मुलाने कार थांबवली. मात्र, त्याने कार चालूच ठेवली होती. तो एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. यावेळी कारमध्ये प्रभावती भगत या एकट्याच बसल्या होत्या.

हेही वाचा..महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, बलात्काराची केस मागे घेण्यासाठी नवरा-बायकोला विवस्त्र करून बेदम मारहाण

प्रभावती यांना एकटं बघून चोरट्यांनी कारमध्ये शिरून कारसह त्यांना पळवून नेलं. काही अंतरावरील निर्मनुष्य ठिकाण बघून चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने आणि पैसे घेतले आणि महिलेवर गोळीबार करून नंतर गाडी उलव्यामधील सेक्टर 24 मध्ये सोडून पसार झाले. महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या हेतूने ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.

हेही वाचा..नेमकं असं काय घडलं की, पोटच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाप निर्दोष सुटला

दुसरीकडे, भुसावळ (जि.जळगाव) येथील कोळी वाड्यात दूध विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. नासिर बशीर पटेल असं मृत व्यक्तीचे नाव होतं. नासिर साकेगाव येथील रहिवासी असून भुसावळ येथे सायंकाळी दूध वाटपासाठी आला होता. कोळी वाड्यात एका युवकाने नासिर याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. यात नसीरचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर भुसावळ येथील परिसरात खळबळ उडली आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.

हेही वाचा..भक्तांना प्रसाद म्हणून चहामध्ये दिलं चक्क पेट्रोल, गुन्हा दाखल होताच महाराज फरार

First published: March 2, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या