जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नेमकं असं काय घडलं की, पोटच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाप निर्दोष सुटला

नेमकं असं काय घडलं की, पोटच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाप निर्दोष सुटला

नेमकं असं काय घडलं की, पोटच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाप निर्दोष सुटला

ठाण्यातील एका कोर्टाने 2017 मध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या 51 वर्षीय आरोपी बापाची निर्दोष मुक्तता केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

**ठाणे,1 मार्च:**ठाण्यातील एका कोर्टाने 2017 मध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या 51 वर्षीय आरोपी बापाची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायाधीश के.डी.शिरभाटे यांनी हा निकाल दिला. न्यायाधीश शिरभाटे यांनी सांगितलं की, अभियोजन पक्ष आरोपीविरोधात पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे विफल ठरला. परिणामी पुराव्याअभावी नराधम बापाला कोर्टाला निर्दोष मुक्त करावे लागले. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 504, 506, 100 (3) आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल होता. अभियोजन पक्षाने कोर्टात सांगितलं की, पीडित मुलगी ठाणे शहरात पंचपखाडी परिसरात वडिलांसोबत राहत होती. मुलीच्या आई-वडिलांमध्ये काडीमोड झाली आहे. हेही वाचा… जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत , नंतर रचलं असं कुभांड! नराधम बाप आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता, असे अभियोजन पक्षानं कोर्टात सांगितलं. पीडित मुलगी 25 डिसेंबर 2017 रोजी मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. नंतर ती घरी आली. तिने जेवण केलं. तेव्हा आरोपी घरीच होता. ती झोपायला गेली असता आरोपी बापाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलगी 17 वर्षाची होती. ती 12 वीत शिक्षण घेत होती. पीडित मुलीने विरोध केला असता नराधमाने तिला चाकू दाखवत शरीर सुखाची मागणी केली. मुलीने स्पष्ट विरोध केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नराधमाच्या बापाच्या तावडीतून कशीबशी पीडितेने स्वत: ची सुटका करून घराबाहेर पळाली. शेजारच्यांना आपबिती सांगितली. नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती अभियोजन पक्षाने कोर्टात सांगितली. हेही वाचा.. पत्नी पळून गेली प्रियकरासोबत, तिला शोधण्यासाठी पतीने केलं भयकंर कृत्य! बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद करत अभियोजन पक्षाने केलेले आरोप फेटाळून आरोपीला फसवण्यात आल्याचे कोर्टात सांगितलं. मुलीने बापाविरुद्ध केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. दरम्यान, अभियोजन पक्षाला आरोपीविरुद्ध ठोस पुरावे कोर्टात सादर करता आले नाही. न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तीबाद मान्य केले. पुराव्याअभावी आरोपीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. हेही वाचा.. वडिलांची हत्या करून 10 वीतील मुलाने घरातच पुरला मृतदेह, 2 महिन्यांनंतर झाला उलगडा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rape case
  • First Published :
जाहिरात
जाहिरात