Home /News /maharashtra /

भक्तांना प्रसाद म्हणून चहामध्ये दिलं चक्क पेट्रोल, गुन्हा दाखल होताच महाराज फरार

भक्तांना प्रसाद म्हणून चहामध्ये दिलं चक्क पेट्रोल, गुन्हा दाखल होताच महाराज फरार

अंबादास महाराज हे भक्तांना नेहमीच पेट्रोल मिश्रित चहा प्रसाद म्हणून देतात. हा चहा प्यायल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होतात

अमरावती,2 मार्च: पुण्यात अघोरी बाबा महिलांची नग्न पूजा करत त्यांच्या शरीरावर लिंबू चोळून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानी आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. भजनाच्या वेळी संभा उर्फ अंबादास महाराजांनी भक्तांना प्रसाद म्हणून दिलेल्या चहामध्ये चक्का पेट्रोल दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रसादातून पाच जणांना विषबाधा झाली आहे. ही घटना दर्यापूर तालुक्यातील उंबरी रसुलापूर या गावात घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाच भक्तांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेही वाचा..शिक्षिकेची अघोरी शिक्षा, 5वीच्या विद्यार्थ्याला काढायला सांगितल्या 200 उठाबशा अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील संभ उर्फ अंबादास महाराज यांचे दर्यापूर तालुक्यातील उमरी इतबारपूर येथे सुरेश घायसुंदर यांच्याकडे भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या भजनाला अनेक भक्तांनी हजेरी लावली होती. भजनाचा कार्यक्रम सुरू असतानाच महाराजांनी प्रसाद म्हणून भक्तांना चहा दिला. हा चहा प्यायल्याने उपस्थित पाच भक्तांना विषबाधा झाली. यात अजय चव्हाण नामक भक्ताची प्रकृती खालावल्याने त्याला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाराजांनी भक्तांना पेट्रोल मिश्रित चहा दिल्यानेच विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हेही वाचा..पोटच्या मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बापाची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता, वाचा का? पेट्रोल मिश्रित चहा प्यायल्याने आजार बरे होतात.. अंबादास महाराज हे भक्तांना नेहमीच पेट्रोल मिश्रित चहा प्रसाद म्हणून देतात. हा चहा प्यायल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होतात, अशी भक्तांची भाबडी भावना आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या भजनाच्या कार्यक्रमात प्रसादात दिलेल्या चहामध्ये पेट्रोलचे प्रमाण जास्त झाल्याने भक्तांना विषबाधा झाली. या प्रकरणी अंबादास महाराज यांच्याविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी महाराज पसार झाला आहे. या प्रकरणाचा तपास रहिमापूर पोलिस स्टोशनचे ठाणेदार शेख जलील करत आहे. आरोपी अंबादास महाराज यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या