नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 19 एप्रिल : वर्धा (Wardha) जिल्ह्यात आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील (District General Hospital) आरोग्य सेवा कोलमडली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 2 तास मृतदेह दारात पडून होता. मात्र, त्याला उचलायला कुणी तयार नव्हते. अखेर नातेवाईकानी मृतदेह गाडीत टाकून घर गाठल्याची घटना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आली.
जिल्ह्याच्या शिरपूर येथील रुग्णाला ताप आला म्हणून 17 तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्रीला भरती करण्यात आले होते. रात्रभर त्याच्यावर उपचार केला नसल्याने सकाळच्या सुमारास मृत्यू झाला, असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर बराच काळ मृतदेह बेडवरच पडून होता. त्यानंतर त्याला कोविडच्या किटमध्ये रॅप करण्यात आले. मृतदेह उचलायला कुणीच तयार नव्हते. अखेर नातलगांनी मृतदेहाला बाहेर काढले.
अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11
मात्र, रुग्णवाहिका नसल्याने यात दोन तासाचा अवधी निघून गेला. परंतु, संतप्त झालेल्या परिवाराला सांत्वना देण्यासाठी आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी तिथे आला नव्हता. मरगळ आलेल्या वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णासोबत आता मृतदेहाची सुद्धा अवहेलना केली जात आहे. मात्र मुर्दाड प्रशासन आणि त्यातील अधिकारी यांच्यातील माणुसकी मेली काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर
विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना सामान्य रुग्णालयात घडली त्यावेळी मात्र निर्णय देणारा जबाबदार व्यक्ती कुणीच नव्हतं, परिणामी वर्ध्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय सामन्यांचे राहिले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पण रविवार असल्याने सगळ्यांचे मोबाईल बंद व नॉटरिचेबल दाखवत होते. त्यामुळे जिल्ह्यात वाढलेला संसर्ग आणि कोलमडलेली आरोग्य व्यवस्था याबाबत हे अधिकारी किती गंभीर आहे हे दिसून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Pandemic, Wardha, Wardha news