Home /News /maharashtra /

खुशखबर...नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून टप्पाटप्पाने सुरू होणार

खुशखबर...नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून टप्पाटप्पाने सुरू होणार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस सक्तीचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान जीवनाश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. असं असताना एका दिलासा देणारी बातमी आहे.

  नवी मुंबई, 25 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस सक्तीचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान जीवनाश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. असं असताना एका दिलासा देणारी बातमी आहे. नवी मुंबईत शनिवारपासून एपीएमसी मार्केट टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परराज्यातून येणारा माल सुरक्षीत येण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यादरम्यान सॅनिटाझर, टेंम्प्रेचर मशीन बाजार समिती उपलब्ध करून देणार आहे. हेही वाचा...Corona Lockdown: दारुचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश, या राज्यात विक्री सुरु मिळालेली माहिती अशी की, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी एपीएमसीमधील गर्दी कमी करणार आहे. शनिवारपासून मार्केट टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोचवण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळा ग्राहकांलाठी भाजीपाला किराणा दुकानात उपलब्ध करुन देण्यात येणाप आहे. विशेष म्हणजे परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या गाड्यांवर बाजार समितीचे स्टीकर्स लावण्यात येणार आहे. कोकण आयुक्तांच्या अंडर वॉर रूम तयार करण्याचे काम सुरू असल्याचीही माहिती मिळाली आहे. हेही वाचा...'मोदीजी काहीतरी मागत आहेत... ऐकणार ना? देवेंद्र फडणवीसांनी घातली भावनिक साद जीवनाश्यक वस्तू-पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना विशेष परवाना देशभरात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना जिल्हा आणि शहरांच्या सीमेवर पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालयाने जीवनाश्यक वस्तू आणि पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना विशेष परवाना देण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. जेणेकरून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचा पुरवठा होत राहील. हेही वाचा.. कोरोनाच्या भीतीने रुग्ण तपासण्यास नकार, डॉक्टर तुम्ही सुद्धा? सरकारने दिला इशारा

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या