Home /News /mumbai /

कोरोनाच्या भीतीने रुग्ण तपासण्यास नकार, डॉक्टर तुम्ही सुद्धा? सरकारने दिला गंभीर इशारा

कोरोनाच्या भीतीने रुग्ण तपासण्यास नकार, डॉक्टर तुम्ही सुद्धा? सरकारने दिला गंभीर इशारा

खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत.

    मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जीव धोक्यात घालून डॉक्टर आपले कर्तृव्य पार पाडत आहे. परंतु, काही ठिकाणी खासगी डॉक्टरांना कोरोनासंबंधित रुग्णांना रुग्णांना तपासण्यास नकार देत आहे. त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आता थेट इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसविरोधात शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहे. खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स आणि खाजगी रुग्णालय त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत, असं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. हेही वाचा - लॉकडाऊन दरम्यान सरकारचं काम कसं सुरू राहणार? हा आहे मोदींचा प्लान 'बी' खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास  संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असाही इशारा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला. खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत. पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत, अशी माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. 'या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची संदर्भात लक्षणे आढळल्यास आपण आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी', असं आवाहनही त्यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या