Home /News /national /

Coronavirus Lockdown: दारुचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश, या राज्यात विक्री सुरु राहणार

Coronavirus Lockdown: दारुचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश, या राज्यात विक्री सुरु राहणार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून संपूर्ण भारतात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे.

    बंगळुरू, 25 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून संपूर्ण भारतात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान मात्र केरळ राज्यात मद्य विक्री सुरु राहणार आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. मद्यविक्रीचा राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या विचित्र स्थितिचा हवाला दिला आहे. एवढेच नाही तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या एका कथित ट्वीटचाही हवाला दिला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं की, 'माझ्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा एक संदेश आहे. पंजाबमध्ये सर्व आवश्यक सेवा सुरु राहतील. उदा. किराणा सामान, मद्य...' राज्यात निर्माण झालेली विचित्र परिस्थिती लक्षात घेता. अशा प्रकारचा उपाय करणे गरजेचे आहे. हेही वाचा...पोलीस आईनं पोटच्या लेकीला करोनाच्या भीतीनं ठेवलं अडीचशे किलोमीटर दूर मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये दारुची दुकाने सुरु राहातील. सरकारने लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीवर निर्बंध घातले तेव्हा वेगळा अनुभव आला होता. अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. दुसरीकडे, लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर विरोधा पक्ष नेता रमेश चेन्निथला यांनी कडाडून टीका केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात धोकादायक स्थिति निर्माण होऊ शकते. सरकारने निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. दरम्यान, केरळ सरकारला मद्यातून 2,500 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. राज्याला एकूण उत्पन्नाच्या ते 15 टक्के आहे. हेही वाचा...काय म्हणावं याला? जीव घालून ड्युटी करणाऱ्या पोलिसावर घातली गाडी! रिपोर्टनुसार, पंजाब सरकारने सांगितलं की, 31 मार्चपर्यंत राज्य सरकारने मद्यविक्री सुरु ठेवली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर यांनी ट्वीट करुन याबाबत खुलासा केला आहे. शनिवारी (25 मार्च) राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली होती. त्यात किराणा सामान, ताजी फळे, भाज्या, पिण्याचे पाणी तसेच सर्व पेय वस्तूंना सूट देण्यात आली होती. यादरम्यान, केरळमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहातील. मात्र, राज्यातील कासरगोडमध्ये सोमवारी कोरोनो व्हायरसचे 38 रुग्ण आढळून आल्यानंत दुकाने सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहातील, अशी सूचना देण्यात आली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या