'मोदीजी काहीतरी मागत आहेत... ऐकणार ना? देवेंद्र फडणवीसांनी घातली भावनिक साद

'मोदीजी काहीतरी मागत आहेत... ऐकणार ना? देवेंद्र फडणवीसांनी घातली भावनिक साद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुढीपाडवा साजरा करत एक भावनिक साद घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनाच्या सावटामुळे काहीसा साधेपणाने साजरा झाला. शोभायात्रा टाळत लोकांनी गर्दी टाळल्याचं पाहायला मिळालं. अनेक मोठ्या नेत्यांनीही आपल्या घरी गुढीपाडवा साजरा करत लोकांना गर्दी टाळण्याचंच आवाहन केलं. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुढीपाडवा साजरा करत एक भावनिक साद घातली आहे.

'सण, उत्सव औपचारिकता कधीही नव्हत्या... नसतील. आपल्या संस्कृतीत प्रत्येक उत्सवाला अर्थ आहे, त्यात एक संदेश आहे. रस्ते, कामाची जागा, हेच आपले घर मानून अनेकांनी देशसेवेत मोठे योगदान दिले. आज घरी थांबून देशसेवा तुम्हाला करायची आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला काही मागताहेत. ऐकणार ना? घरी रहा, सुरक्षित आणि आनंदी रहा, हाच या गुढीपाडव्याचा संकल्प आहे. पुन्हा एकदा सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा,' असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत सर्वांना या सणाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसंच राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 'जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

'कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

First published: March 25, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading