नगरसेविका पुत्रासह 12 प्रतिष्ठीतांना रंगेहात पकडलं, करत होते बेकायदा कृत्य

नगरसेविका पुत्रासह 12 प्रतिष्ठीतांना रंगेहात पकडलं, करत होते बेकायदा कृत्य

परभणी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

परभणी, 28 मे: परभणी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठी कारवाई केली आहे. शहराच्या सीमेवर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून शहरातील 12 बारा प्रतिष्ठीत नागरिकांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यामध्ये महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविकेच्या पुत्राचा समावेश आहे. पोलिसांनी रोख रकमेसह महागडे मोबाईल असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा.. अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी? शेतात आढळला गुराख्याचा मृतदेह

परभणी-गंगाखेड रोडवर असलेल्या एका जिनिंगमध्ये बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणी शहरातील व्यापारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील 12 प्रतिष्ठीत नागरीक जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. मारलेल्या धाडीमध्ये रोख रकमेसह इतर साहित्य असा 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जगभरामध्ये कोरोनाचं संकट वाढत असताना लॉकडाऊन आणि सोशल डिस्टस्टिंगसारखे नियम घालून सरकार याला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जुगारासाठी व्यसनाधीन झालेल्या लोकांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही, असाच काहीसा प्रकार या घटनेतून समोर आला आहे. परभणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा..कुणाचं काय तर कुणाचं काय! पती होम क्वारंटाइन असताना पत्नी प्रियकरासोबत पळाली

दरम्यान, देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. जमावबंदीचा कायदा लागू करण्यात आला असताना अनेक जण एकत्रित येतात, वेगवेगळे कार्यक्रम करत असल्याचं समोर आलं आहे.

First published: May 28, 2020, 10:40 AM IST

ताज्या बातम्या