जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कुणाचं काय तर कुणाचं काय! पती होम क्वारंटाइन असताना पत्नी प्रियकरासोबत पळाली

कुणाचं काय तर कुणाचं काय! पती होम क्वारंटाइन असताना पत्नी प्रियकरासोबत पळाली

कुणाचं काय तर कुणाचं काय! पती होम क्वारंटाइन असताना पत्नी प्रियकरासोबत पळाली

कोरोनामुळे पती होम क्वारंटाइन असल्याची संधी साधून एका महिलेनं प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 27 मे: कोरोनामुळे पती होम क्वारंटाइन असल्याची संधी साधून एका महिलेनं प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पलायन केलेल्या महिलेला तीन अपत्य आहेत. तरी देखील ती प्रियकरासोबत पळून गेली. याबाबत महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार एक स्थलांतरित मजूर असल्याचं समजतं. हेही वाचा…  मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 50 वर्षीय मजूर श्रामिक स्पेशन ट्रेनने 19 मे रोजी दिल्लीहून मुंदेरीमधील आपल्या गावी पोहोचला. तो दिल्लीत एका बांधकाम साईटवर मोलमजुरी करत होता. गावी पोहोचल्यानंतर त्याला स्थानिक प्रशासनाने 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केलं. त्याची पत्नी आणि मुले गेल्या दीड वर्षापासून गावी राहत होते. घरामध्ये तो पहिल्या मजल्यावर तो राहत होता तर पत्नी आणि मुले तळ मजल्यावर राहत होते. तीन मुलांच्या आईचा पोबारा.. 24 मे रोजी सकाळी तो उठला. खोलीचा दरवाजा उघडायला गेला असता दरवाज्याला बाहेरुन कडी लावलेली आढळून आली. मोठी कसरत करून त्याने दरवाज्याची कडी उडघली. तळ मजल्यावर गेला असता पत्नी कुठेही दिसली नाही. आपली आई कुठे गेली हे देखील मुलांना माहीत नव्हते. हेही वाचा.. खाकी वर्दीतला लाचखोर, अधिकाऱ्याचा प्रताप ऐकून पोलीस दल हैराण मजुराने चेहऱ्याभोवची चादर गुंडाळून शेजारी, नातेवाईकांकडे पत्नीबाबत विचारणा केली. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. मजुराची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मजुराने थेट पोलिस स्टेशन गाठून पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याप्रकरणी तक्रार नोदंवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात