Home /News /maharashtra /

अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी? शेतात आढळला गुराख्याचा मृतदेह

अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी? शेतात आढळला गुराख्याचा मृतदेह

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात उन्हाचा पारा 46 डिग्री सेल्सिअसच्या वर गेला आहे.

अमरावती, 28 मे: गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात उन्हाचा पारा 46 डिग्री सेल्सिअसच्या वर गेला आहे. तिवसा तालुक्यातील डेहनी शेतीशिवारात एका 58 वर्षीय गुराख्याचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. गुराख्याचा मृत्यु उष्माघाताने झाल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. हेही वाचा.. मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? याबाबत काय म्हणाले गृहमंत्री साहेबराव मोहोड (वय-58 वर्षे, रा.डेहनी) असं व्यक्तीचं नाव आहे. साहेबराव नेहमीप्रमाणे जनावरे चराईसाठी डेहनी शेतशेवारात गेले होते. एका झाडाखाली त्याचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.  उन्हाचा तडाखा बसल्याने गुरख्याचा मृत्यू झाला, असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढच्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढणार आहे. उत्तर भारतातील बर्‍याच भागांत 29-30 मे रोजी धुळीच्या वादळाची शक्यता आहे. ज्यामुळे उन्हाचा प्रादुर्भाव दूर होऊ शकतो भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) उत्तर भारतासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षात मान्सूनची स्थिती पाहिल्यास मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून श्रीलंकेपासून ते म्यानमारपर्यंत पोहोचलेला असतो. पण यावेळी त्याची काहीही चिन्ह दिसत नाही आहे. या राज्यांना उष्णतेचा सर्वाधिक धोका येत्या पाच दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये कडक उष्णतेचा तडाखा असणार आहे. छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि उत्तर आतील कर्नाटकातील वेगळ्या भागातही उष्णतेची लाट येऊ शकते. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार उष्णता पसरली आहे आणि काही ठिकाणी तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जात आहे. राजस्थानातील चूरू इथे सोमवारी दिवसाचे सर्वाधिक तापमान 47.5 डिग्री सेल्सिअस, तर उत्तर प्रदेशात अलाहाबाद सर्वात उष्ण तापमान होते जेथे तापमान 46.3 डिग्री सेल्सियस होते. हेही वाचा... 24 तासांत देशात 6566 नवीन रुग्ण, मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू यंदा पावसाळा उशीरा दाखल होणार असल्यामुळे यावेळी केरळमध्ये मान्सून उशीर दाखल होईल असं याआधीच हवामान खात्याने स्पष्ट केलं होतं. केरळमध्ये मान्सून दरवर्षी जूनला येतो. परंतु यावेळी तो 5 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या