ठाणे, 20 जुलै: मुसळधार पावसाने ठाण्यातील (Thane) कळव्याच्या (Kalwa) घोलाईनगर येथे दरड कोसळली (Thane landslide) आणि 5-7 घरं पुर्णत: गाडली गेली. ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 50 जणांना आपला जीव वाचवता आला. या दुर्घटनेत 12 वर्षांचा शिवकुमार ही बचावला. ज्या शाळेत शिवकुमार (Shivkumar) शिकत होता त्याच शाळेत त्याला आता आसरा घ्यावा लागतोय.
12 वर्षांचा शिवकुमार झा. गेली दीड वर्षे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिवकुमार शाळेत जाऊ शकला नाही. दीड वर्षांनी शिवकुमार शाळेत आलाय पण कारण डोक्यावरच छप्पर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने ज्या शाळेत शिवकुमार शिकत होता. त्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतच शिवकुमारला जीव वाचवण्यासाठी रात्रभर आसरा घ्यावा लागला. 19 जुलैच्या दुपारी 12.30 च्या दरम्यान जेवण करून शिवकुमार घराबाहेर पडतच होता की. एकाएकी त्याचा घराच्या दरवाजासमोर मोठा दगड पडला आणि शिवकुमारच्या डोळ्यांसमोर अंधार झाला थोड्याच वेळाने शिवकुमारला शुद्ध आली तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं. तो मातीच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत गाडला गेला होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत होते. नशीब बलवंत्तर होतं म्हणून शिवकुमार थोडक्यात वाचला. पण शिवकुमारच्या पायाला जबर मार लागला.
टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीची काढली छेड;वर्ध्यातील तरुणाला कोर्टाचा दणका
आदित्यनाथ हा ही याच कळवा येथील घोलाईनगर झोपडीपट्टीत राहतो. १९ जुलैच्या दुपारी दरड कोसळण्याची घटना घडली ती दुर्देवी घटना आदित्य नाथने आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि थोडक्यात बचावलेल्या आदित्य नाथने तिथून पळ न काढता मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शिवकुमार आणि त्याच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्याचे धाडस केले. ज्यामुळे शिवकुमार आणि त्यांचे कुटुंबीय आज सुखरुप आहेत.
बॅनरवर फोटो न लावल्याने शिवसेनेत राडा; आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले
शिवकुमार आणि त्याच्या कुटुंबीयांसारखेच 50 पेक्षा जास्त जण आहेत ते या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मुसळधार पाऊस पडला की डोंगर आणि टेकडी पट्ट्यात बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर दरड कोसळून अनेकांचे जीव जातात. पण या झोपड्या जेव्हा बांधल्या जातात तेव्हाच यांच्यावर कारवाई केली गेली तर लोकांचे जीव जाणार नाही आणि जर अशी घटना घडली की. या अनधिकृत झोपड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली तर अशा घटना घडणार नाहीतय आणि शिवकुमार सारख्या अनेकजणांच्या डोक्यावरुन छप्पर ही जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Pune landslide, Thane