Home /News /maharashtra /

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीची काढली छेड; वर्ध्यातील तरुणाला कोर्टाचा दणका

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीची काढली छेड; वर्ध्यातील तरुणाला कोर्टाचा दणका

Crime in Wardha: अल्पवयीन मुलीची (Minor girl) छेड (molestation) काढल्याप्रकरणी वर्ध्यातील (Wardha) एका तरुणाला न्यायालयानं चांगलीच अद्दल घडवली आहे.

    वर्धा, 20 जुलै: अल्पवयीन मुलीची (Minor girl) छेड (molestation) काढल्याप्रकरणी वर्ध्यातील (Wardha) एका तरुणाला न्यायालयानं चांगलीच अद्दल घडवली आहे. न्यायालयानं (Court) दोषी तरुणाला 2 वर्षांच्या सश्रम कारावासासह (2 years rigorous imprisonment) आर्थिक दंडही ठोठावला आहे. आरोपीनं टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या (listening song on terrace) एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत. न्यायालयानं दोषी तरुणाला ही कठोर शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालाचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं आहे. नेमकी घटना काय आहे? पीडित मुलगी घराच्या छतावर उभी राहून आपल्या मोबाइलवर गाणी ऐकत होती. दरम्यान अल्पवयीन मुलीला टेरेसवर एकटी पाहून आरोपी त्याठिकाणी आला. त्यानं पीडित मुलीशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला होता. यानंतर पीडित मुलीनं रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी 33 वर्षीय आरोपी मिलिंद पांडुरंग राऊत याला अटक करून कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे. हेही वाचा-Pune: पुस्तकं द्यायला आलेल्या विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकाचं संतापजनक कृत्य दोन वर्षांचा सश्रम कारावास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे सादर केल्यानंतर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिलिंद पांडुरंग राऊत याला विविध कलमान्वये दोन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 2 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. हा दंड वेळेत न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास सुनावला आहे. हेही वाचा-मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त; वर्षभर केला जात होता रेप यासोबतच पीडितेला नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचं अनेक स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच अल्पवयीन मुलींची छेड काढून मोकाट फिरणाऱ्या आरोपींना थोड्याफार प्रमाणात जरब बसण्याची शक्यता असल्याचं मत घटनातज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Sexual harassment, Wardha

    पुढील बातम्या