जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बॅनरवर फोटो न लावल्याने शिवसैनिक आपसात भिडले; शिवसेना तालुका प्रमुख गंभीर जखमी

बॅनरवर फोटो न लावल्याने शिवसैनिक आपसात भिडले; शिवसेना तालुका प्रमुख गंभीर जखमी

बॅनरवर फोटो न लावल्याने शिवसैनिक आपसात भिडले; शिवसेना तालुका प्रमुख गंभीर जखमी

बॅनरवर फोटो न लावल्यावरुन झालेल्या वादानंतर शिवसैनिक आपसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बालाजी निरफळ, प्रतिनिधी उस्मानाबाद, 20 जुलै : शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात संपर्क अभियान (Shiv Sena Sampark Abhiyan) सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यावर भर दिला जात आहे. मात्र, या शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या संदर्भातील बॅनरवरुन उस्मानाबाद (Osmanabad) मध्ये शिवसैनिकांत जोरदार राडा (Clash among Shivsainik) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागातून शिवसैनिक आपआपसात भिडले. यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा शिवसेनेतच राडा झाला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव (Anna Jadhav) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तब्बल 25 जणांनी लाठ्या काठ्या, बाटल्या घेऊन हा हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात hoarding war: अजितदादा कारभारी लय भारी तर देवेंद्र नवपुण्याच्या विकासाचे शिल्पकार, पाहा PHOTOS सध्या तालुका स्थरावर शिवसेना संपर्क अभियान सुरू असून या अभियानमध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर न लावल्याने हा वाद झाल्याचे समजतेय. या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. या प्रकारामुळे शिवसेनेतील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून दोन्ही आजी माजी आमदारांनी यावर मात्र अद्यापपर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. हा वाद येथेच सुरू राहतो का वाढतो या बाबत चर्चा सुरू असून मारहाण झालेल्या अण्णा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नबार्शीमधील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात